
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेऊन मुंबईत परत आले आहेत. काही दिवसांपूर्वी दोघं मालदीवमध्ये गेले होते. टायगर आणि दिशा दोघांनाही विमानतळावर स्पॉट करण्यात आलं आहे.

फोटोंमध्ये टायगर आणि दिशा कूल अवतारात दिसले. टायगरनं पांढऱ्या रंगाचा पँट आणि फेन्ट ब्लू टीशर्ट कॅरी केला होता. सोबतच त्यानं निळ्या रंगाचा मास्क लावला होता.

दिशा पाटनीही विमानतळावर ग्लॅमरस अवतारमध्ये दिसली. तिनं डेनिमसोबत पिंक क्रॉप टॉप कॅरी केलं होतं. यावेळी दिशा प्रचंड सुंदर दिसत होती.

दिशाने मालदीवमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यात बिकिनीमध्ये तिनं एक फोटो शेअर केला होता. तिचा तो फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

टायगर आणि दिशा सहसा सोबत फिरायला जातात मात्र त्या ठिकाणाहून कधीच एकत्र फोटो शेअर करत नाहीत. काही दिवसांपूर्वी दिशा आणि टायगर एकत्र मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते.