Mamta Kulkarni: 5 वर्षे अखंड मंत्रजप अन् एका सकाळी साक्षात गणपती बाप्पा समोर.. ममता कुलकर्णीचा धक्कादायक दावा

Mamta Kulkarni : 90 च्या दशकात मोठ्या पडद्यावर राज्य करणारी ममता अचानक गायब झाली आणि 2025 मध्ये झालेल्या महाकुंभ दरम्यान चर्चेत आली. आता अभिनेत्रीने दावा केला की, तिला साक्षात सकाळी गणपती बप्पाने दर्शन दिलं. जाणून घ्या ममता कुलकर्णी नेमकं काय म्हणाली.

Mamta Kulkarni: 5 वर्षे अखंड मंत्रजप अन् एका सकाळी साक्षात गणपती बाप्पा समोर.. ममता कुलकर्णीचा धक्कादायक दावा
Mamta Kulkarni
| Updated on: Nov 26, 2026 | 8:08 AM

Mamta Kulkarni: बॉलिवूड सोडून अध्यात्म स्वीकारलेली ममता कुलकर्णी आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील ममता हिने मोठा दावा केला आहे. सलग पाच वर्ष अखंड मंत्रजप केल्यानंतर तिला साक्षात गणपती बप्पा यांनी दर्शन दिलं. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत ममता कुलकर्णी हिने तिच्या अध्यात्मिक जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सांगायचं झालं तर, 90 च्या दशकात मोठ्या पडद्यावर राज्य करणारी ममता अचानक गायब झाली आणि 2025 मध्ये झालेल्या महाकुंभ दरम्यान चर्चेत आली. त्यानंतर तिने स्वतः सांगितलं की, तिने आता अध्यात्माची निवड केली आहे.

25 वर्षे तपस्या केली, सर्वकाही फेकून दिलं…

Loading...

मुलाखतीत ममता कुलकर्णी हिने सांगितलं की, ‘मी तब्बल 25 वर्ष तपस्या केली. सर्वकाही फेकून दिलं… एका शाळेची बस होती… विलेपार्ले येथे एक स्मशानभूमी होती… मुलांना घेण्यासाठी शाळेची बस तेथेच थांबायची. माझी नजर कायम त्या स्मशानभूमीकडेच असायची. मी त्या शाळेत जवळपास 10 वर्ष होती, सेंट जोसेफ कॉन्वेंट विले पार्ले जुहू… ‘

‘नियम न मोडता 5 वर्ष मंत्राचं जप करत राहिली…’

पुढे ममता हिने सांगितलं की, ‘माझ्या शाळेतील एका शिक्षकांनी मला सांगितलं होतं की, सलग 5 वर्ष गणपती मंत्राचं जप केल्यानंतर बाप्पाचं दर्शन होईल… तेव्हा तर मी लहान मुलगी होते, त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवलाय आणि 5 वर्ष कोणताच ब्रेक न घेता मी मंत्राचा जप करत राहिली. त्यानंतर एके दिवशी सकाळी माझ्या समोर साक्षात गणपती बाप्पा उभे होते…’, असं देखील ममता कुलकर्णी म्हणाली.

‘पाहिलं तर फक्त सलमान खान, शाहरुख आणि आमिर खानच होते’

एवढंच नाही तर ममता हिने इतक्या वर्षांनंतर टीव्ही शोमध्ये येण्याबाबत भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “नुकतंच मला ‘लाफ्टर शेफ’मध्ये कोणीतरी बोलावलं होतं. तिथे मी बऱ्याच आध्यात्मिक गोष्टी बोलले होते. पण त्यांनी सर्वकाही कापून टाकलं… मी भगवतीचं गाणं गायलं होतं, मी नारायण स्तोत्र म्हटलं होतं. मला काय येत नाही? पण नंतर पाहिलं तर त्यात फक्त सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान आणि ‘इक मुंडा’, ‘छत पर सोया था बहनोई’ हीच गाणी होती. यावर आता मी काय बोलणार… असं देखील ममता कुलकर्णी म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ममता कुलकर्णी हिची चर्चा रंगली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us