‘मन की आवाज प्रतिज्ञा’ मालिकेतील अभिनेत्रीचं लूक पाहून व्हाल हैराण; वयाच्या ३१ व्या वर्षी अशी दिसते प्रतिज्ञा

'मन की आवाज प्रतिज्ञा' मालिकेच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री पूजा गौर आता कशी दिसते; वयाच्या ३१ व्या वर्षी बदललं अभिनेत्रीचं लूक

मन की आवाज प्रतिज्ञा मालिकेतील अभिनेत्रीचं लूक पाहून व्हाल हैराण;  वयाच्या ३१ व्या वर्षी अशी दिसते  प्रतिज्ञा
| Updated on: May 19, 2023 | 5:11 PM

मुंबई : टीव्ही विश्वातील काही अशा अभिनेत्री आहेत, ज्यांची लोकप्रियता अनेक वर्षांनंतर देखील कमी झालेली नाही. मालिकांमध्ये काही अभिनेत्री प्रेमळ स्वभावाच्या मुलीची व्यक्तीरेखा साकारताना दिसल्या, तर काही अभिनेत्री ‘दबंग गर्ल’च्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस आल्या अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री पूजा गौर. पूजा गौर हिने अनेक मालिकांमध्ये काम केलं. पण अभिनेत्रीला ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ मालिकेच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली. ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ मालिकेतून पूजा घरा-घरात पोहचली. ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ मालिकेत अभिनेत्रीने एका सशक्त महिलेची भूमिका साकारली होती. मालिकेत साडीमध्ये दिसणारी पूजा आता प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

सध्या अभिनेत्री पूजा गौर हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये पूजा प्रचंड हॉट दिसत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये पूजाने निळ्या रंगाचा सॅटीनचा ड्रेस घातला आहे.. फोटोमध्ये अभिनेत्री नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. सध्या सर्वत्र पूजाचे फोटोंची चर्चा आहे.

 

 

पूजा हिच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, तिने २००९ मध्ये ‘कितनी मोहब्बत है’ मालिकेत पूर्वी हनीश शर्मा या भूमिकेत दिसली. त्यानंतर २०१२ मध्ये ‘लाखों में एक’ मालिकेत दिसली. २०१३ ते २०१५ पर्यंत तिने सावधान इंडिया शोला होस्ट देखील केलं… पण २००९ साली प्रसारित झालेल्या ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ मालिकेतून अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

 

 

टीव्ही शिवाय अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ७९८ पेक्षा जास्त चाहते आहेत. सध्या सोशल मीडियावर तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.