मान्यवर आणि मोहे यांच्या नवीन कॅम्पेनमध्ये विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंधाना झळकले

मान्यवर आणि मोहे यांनी अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मधांना यांच्यासोबत एका नवीन कॅम्पेन लॉन्च केले आहे. हे कॅम्पेन प्रचार कम्युनिकेशन्सने डिझाइन केले आहे.

मान्यवर आणि मोहे यांच्या नवीन कॅम्पेनमध्ये विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंधाना झळकले
Mohey
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 09, 2026 | 9:22 PM

एथनिक वेअर ब्रँड मान्यवर आणि मोहे यांनी अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मधांना यांच्यासोबत एका नवीन कॅम्पेन लॉन्च केले आहे. हे कॅम्पेन प्रचार कम्युनिकेशन्सने डिझाइन केले आहे. मोमेंट मार्केटिंगवर आधारित या उपक्रमात या दोन्ही कलाकारांच्या लोकप्रिय जोडीबद्दल प्रेक्षकांमध्ये असलेल्या उत्सुकतेचा फायदा घेतला आहे आणि भारतातील लग्नांच्या पीक सीझनशी त्याला जोडले आहे.

हे कॅम्पेन अतिशय कमी वेळेत तयार करण्यात आले आहे.प्रचार कम्युनिकेशन्स आणि मान्यवर यांच्यातील दीर्घकाळाच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प फक्त काही दिवसांत साकार करण्यात आला. सध्या ही कॅम्पेन डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लॉन्च करण्यात आली आहे. पुढे ती सिनेमा, प्रिंट आणि आउटडोअर मीडियाद्वारेही प्रमोट करण्याची योजना आहे. या कॅम्पेनमध्ये सेलिब्रिटी उपस्थितीसह आधुनिक लग्नाच्या उत्सवावर आधारित स्टोरीटेलिंग सादर करण्यात आले आहे.

प्रचार कम्युनिकेशन्सच्या माहितीनुसार, संपूर्ण कॅम्पेन फक्त तीन दिवसांत संकल्पित करून अंमलात आणली गेली. मान्यवर सोबत दशकाहून अधिक काळ चाललेल्या सहकार्यामुळे निर्णय प्रक्रिया आणि समन्वय जलद झाला, त्यामुळे ही जलद अंमलबजावणी शक्य झाली.

300 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज

कॅम्पेन लॉन्च झाल्यानंतर काहीच दिवसांत त्याला ऑनलाइन मोठा प्रतिसाद मिळाला. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंधाना यांच्या संयुक्त पोस्टला इन्स्टाग्रामवर केवळ 72 तासांत 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आणि 8 मिलियनपेक्षा अधिक ऑर्गेनिक लाईक्स मिळाले. सर्व प्लॅटफॉर्मवर मिळून या कॅम्पेनने आतापर्यंत 300 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज पार केले आहेत आणि 250 मिलियनपेक्षा अधिक युजर्सपर्यंत पोहोचली आहे.

एंगेजमेंट मेट्रिक्सनुसार, या कॅम्पेनला 4 लाखांहून अधिक शेअर्स, सुमारे 65,000 रिपोस्ट्स आणि 29,500पेक्षा जास्त कमेंट्स मिळाल्या आहेत. विविध प्लॅटफॉर्मवर एंगेजमेंट रेट अंदाजे 7 ते 8 टक्क्यांच्या दरम्यान नोंदवला गेला आहे.

विजय आणि रश्मिकामुळे कॅम्पेन अधिक आकर्षक

प्रचार कम्युनिकेशन्सचे डायरेक्टर रक्षित जैन यांनी सांगितले की, केवळ तीन दिवसांत इतकी मोठी कॅम्पेन पूर्ण करणे हे एक आव्हानात्मक काम होते. मान्यवरसोबत असलेल्या दीर्घकालीन विश्वास आणि स्पष्टतेमुळे टीमला जलद काम करता आले. तसेच विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंधाना यांच्या उपस्थितीमुळे ही कॅम्पेन अधिक उत्साहवर्धक झाली.

अभिनेत्री रश्मिका मंधाना ने सांगितले की मान्यनवर आणि मोहे लग्नांना भावना आणि स्टोरीटेलिंगसह साजरे करण्याची एक सुंदर पद्धत दाखवते. त्यांच्या मते या ब्रँडचे आउटफिट्स फक्त फॅशनेबल आणि एलिगंट नसून त्यामध्ये उत्कृष्ट कारागिरी आणि सूक्ष्म तपशीलांवर विशेष लक्ष दिले जाते. अभिनेता विजय देवरकोंडा यांनी सांगितले की, हे कॅम्पेन त्यांना विशेष वाटले कारण ती नातेसंबंधांची खरी ऊर्जा आणि डायनॅमिक्स दाखवते. कन्सेप्ट, संगीत आणि कपडे यांसह सर्व घटक आधुनिकता आणि परंपरेचे सुंदर मिश्रण सादर करतात.

मान्यवरचे चीफ रेव्हेन्यू ऑफिसर वेदांत मोदी यांनी सांगितले की प्रचार सोबतच्या सहकार्यामुळे ब्रँडला नेहमीच नावीन्य आणि सर्जनशीलतेसह काम करण्याचे स्वातंत्र्य मिळते. त्यांच्या मते या कॅम्पेनद्वारे आधुनिक लग्नाची ऊर्जा, आनंद आणि भावना विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंधाना यांच्या माध्यमातून जिवंतपणे सादर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

प्रचार कम्युनिकेशनचे डायरेक्टर वेदांग जैन यांनी सांगितले की मान्यवर आणि मोहे सोबत दशकाहून अधिक काळ काम करण्याचा अनुभव अत्यंत चांगला राहिला आहे. त्यांनी पुढे सांगितले की या कॅम्पेनद्वारे या दोन्ही कलाकारांबद्दल लोकांमध्ये असलेली उत्सुकता एका सांस्कृतिक क्षणात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद त्याच्या यशाची साक्ष देतो.

Follow Us