Sankarshan Karhade : सर अंगावर हात टाका… महिलेची विचित्र मागणी, हैराण झालेला संकर्षण कऱ्हाडे स्पष्टच म्हणाला

Sankarshan Karhade: 'सर अंगावर हात टाका...', महिला चाहितीतीने केलेल्या एका विचित्र मागणीनंतर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हैराण झालेला. हा किस्सा अभिनेत्याने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सांगितला. तर जाणून घ्या अभिनेत्याला आलेला अनुभव....

Sankarshan Karhade : सर अंगावर हात टाका... महिलेची विचित्र मागणी, हैराण झालेला संकर्षण कऱ्हाडे स्पष्टच म्हणाला
Sankarshan Karhade
| Updated on: Nov 13, 2026 | 10:09 AM

Sankarshan Karhade: मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. संकर्षण याने अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण संकर्षण याने लिहिलेल्या कविता ऐकतच राहाव्याश्या वाटचतात. त्याच्या कवितांचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील संकर्षण त्याने लिहिल्या एका कवितेमुळे चर्चेत आला आहे. ही कविता अभिनेत्याने चाहत्यांच्या भेटीवर लिहिली असून, त्यामधील एका कडव्यातील किस्सा फार विनोदी आहे…

कवितेच्या सुरुवातीलाच संकर्षण म्हणतो, नाटकाच्या प्रयोगानंतर जे प्रेक्षक भेटतात त्यांच्यावर मी एक कविता लिहिलेली. कवितेच्या एक कडव्यात अभिनेत्याने महिला चाहितीसोबत झालेल्या भेटीचा अनुभव सांगितला आहे. विनोदी अंदाजात संकर्षण कऱ्हाडे म्हणाला, हे कडवं मी मला आलेल्या अनुभवातून लिहिलं आहे. महिला जवळ आल्यानंतर मी हातावर हात ठेवून उभा राहतो…; असं असताना देखील महिलेची मागणी ऐकून अभिनेता हैराण झालेला.

Loading...

पुढे अभिनेता म्हणतो, ‘एक मॅडम भेटण्याच्या आल्या आणि मला म्हणाल्या ‘सर अंगावर हात टाका, मी म्हटलं, मॅडम अंगावर हात टाकण्याचा अर्थ काय होतो आणि मी कशाला तुमचा नवरा आहे, त्याल सांगा अंगावर हात टाकायला. तिचा नवरा त्याच्यापेक्षा वेडा होता, तो म्हणतोय, सर तुम्ही टाका हात मी फोटो काढतो…’

आलेल्या अनुभवावर कविता करत संकर्षण कऱ्हाडे म्हणतो, ‘सर जवळ या की.. हे आमचं बाळ आहे, याला तुम्ही कडेवर घ्या की… या गुटगुटीत प्रसंगाला मी कसं उत्तर द्यायचं… आहो ते तुमच्या कष्टाचं फळ आहे, ते मी का घ्यायचं…, पुढे प्रेक्षकांचं महत्त्व पटवून देत अभिनेता म्हणतो, ‘असं असलं तरी, प्रेक्षक, कला आणि कलाकार एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत आणि तुम्हीच जर भेटून बोलला नाही तर भेटीला काय अर्थ आहे… त्यामुळे जोवर श्वासात श्वास आहे मी मनोरंजन मोलाचं देईल हे वचन आहे. तुम्ही फक्त टाळी वाजवा मी पुन्हा येईल… तुम्ही फक्त टाळी वाजवा मी पुन्हा येईल…’ सध्या सर्वत्र फक्त संकर्षण याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, संकर्षण कऱ्हाडे सध्या ‘आदि अनंत’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. सिनेमात संकर्षण याच्यामुळे दिग्गज अभिनेते अशोक सराफ मुख्य भूमिकेत आहे. सिनेमा आजोबा आणि नातवाच्या प्रेमळ नात्या भोवती फिरताना दिसणार आहे. सिनेमात अशोक सराफ आजोबांच्या भूमिकेत झळकणार आहेत, तर अभिनेका संकर्षण कऱ्हाडे नातवाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us