Video: ‘कुणाल कामरा तुझी भडXXX बंद कर’, प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याने फटकारलं

कॉमेडीयन कुणाल कामरा सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने एकनाथ शिंदेंचे नाव न घेता केलेली कविता चांगलीच चर्चेत आहे. त्यावर अनेकजण प्रतिक्रिया देत असून निषेध व्यक्त करत आहेत.

Video: कुणाल कामरा तुझी भडXXX बंद कर, प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याने फटकारलं
मराठमोळा अभिनेता
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 29, 2025 | 1:30 PM

कॉमेडियन कुणाल कामरा सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून टीका केली. तेव्हापासून कुणाल कामरा वादात सापडला आहे. पण कुणाल इथेच थांबला नाही. त्याने हा वाद सुरु असताना ‘हम होंगे कंगाल…’ हे आणखी एक गाणे प्रदर्शित केले. कुणाल कामराने या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी सर्वजण करत आहेत. दरम्यान, प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत कुणाल कामराला फटकारले आहे. या अभिनेत्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

हा मराठमोळा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सुशांत शेला आहे. सुशांतने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसेच त्याने असे केले नाही तर ‘तू जिथे असशील तिथे फटकवला जाईल तेही शिवसेना स्टाईलने’ असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर सुशांतचा हा व्हिडीओ तुफान व्हायरसल झाला आहे.

वाचा: अथिया शेट्टीने दाखवली लेकीची झलक? फोटोची सोशल मीडियावर चर्चा

काय म्हणाला अभिनेता?

व्हिडीओमध्य सुशांत बोलत आहे की, ‘जय महाराष्ट्र मी सुशांत शेलार, कुणाल कामरा याने जी काही कविता करण्याचा प्रयत्न केला आणि एक कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली त्याने जे काही स्वत:चे गुण उधळले आहेत त्याविषयी मी पाहिले तर निषेध व्यक्त करतो. आणि मुळात तू ही जी काही उबाटा गटाची भडवेगिरी सुरु केली आहेस ती भडवेगिरी पहिले बंद कर. कलाकार आहेस तर तू कलाकार म्हणून वाग. अशा पद्धतीची टीका करण्याची किंवा कवित्व करण्याची तुझी लायकी नाही. अशा व्यक्तीवर ज्याने इतकं त्यांच्या आयुष्यात काम करुन ठेवलं आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी, ज्यांना अनाथांचा नाथ म्हणून ओळखलं जातं तर त्याचा १ टक्का किंवा १ अंश ही तुझ्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे तुझी तेवढी पात्रता नाही.’

कुणाल कामराला दिली धमकी

पुढे सुशांत कुणालला धमकी देत म्हणाला, ‘मी तुला एवढीच वॉर्निंग देतो की पुढच्या २४ तासात ही जी काही तू कविता केली आहेस त्याविषयी माफी माग अन्यथा तुझ्या तोंडाला काळं वैगरे फासणार नाही. तू जिथे असशील तिथे फटकवला जाईल तेही शिवसेना स्टाईलने आणि हे जे काही तू कार्यक्रम करत फिरतोस ते महाराष्ट्रात कुठेही होऊ देणार नाही. त्याचबरोबर जे स्टुडीओ आहेत त्या स्टुडीओला देखील मी वॉर्निंग देतोय जर का तुम्ही याला कार्यक्रम करण्यासाठी तुमचे स्टुडीओ दिलात आणि तुमच्या स्टुडीओचे काही नुकसान झाले तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. पुन्हा एकदा कुणाल कामरा स्वत:च्या लायकीत रहा, स्वत:च्या अवकातीमध्ये राहा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ही कविता करणं बंद कर. नाही तर तुझं काही खरं नाही.’