AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonia Gandhi: सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची विक्रमी विक्री, आठवडाभरात 2 लाख प्रती विकल्या, किती कोटींची कमाई?

Sonia Gandhi Book: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव या पुस्तकाची तुफान विक्री झाली. आठवडाभरात दोन लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या. यामधून किती कोटीची कमाई झाली?

Sonia Gandhi: सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची विक्रमी विक्री, आठवडाभरात 2 लाख प्रती विकल्या, किती कोटींची कमाई?
सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची विक्रमी विक्री, आठवडाभरात 2 लाख प्रती विकल्या, किती कोटींची कमाई?
| Updated on: Nov 19, 2026 | 10:46 AM
Share

Sonia Gandhi Book: काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव या पुस्तकाने विक्रीचे उच्चांक मोडले आहे. एकाच आठवड्यात या पुस्तकाच्या दोन लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. हार्पर कॉलिन्स इंडियाचे CEO अनंत पद्मनाभन यांनी हे सर्वाधिक वेगाने विक्री होणारे पुस्तक ठरले आहे. तसेच वेगाने विक्री होणारे आत्मचरित्र आणि नॉन-फिक्शन पुस्तक असल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे विक्री सुरू होताच पहिल्या 10 मिनिटातच या पुस्तकाच्या 15,000 हून अधिक प्रती ग्राहकांपर्यंत पोहचल्या.

इतक्या कोटींची झाली उलाढाल

सोनिया गांधी यांचे बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव हे पुस्तक 544 पानांचं आहे. या पुस्तकाची छापील किंमत 1299 रुपये इतकी आहे. काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हे पुस्तक सवलतीत मिळू शकते. त्याची किंमत हजार अथवा त्याच्या आसपास असेल. मूळ किंमतीनुसार या पुस्तकाच्या खरेदी-विक्रीचे गणित मांडले, तर हाही एक विक्रम ठरेल. 1299 किंमतीनुसार दोन लाख प्रती विक्री झाल्याचे गृहीत धरल्यास गेल्या सात दिवसांत या पुस्तकाने 25.98 कोटी म्हणजे जवळपास 26 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

सोनिया गांधी यांना किती रॉयल्टी मिळणार?

या पुस्तकाच्या माध्यमातून सोनिया गांधी यांना किती कमाई झाली असेल याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. काही दाव्यानुसार, देशात हार्डकव्हर पुस्तकांसाठी लेखकाला साधारणतः 10 ते 12.5 टक्के रॉयल्टी दिली जाऊ शकते. काही लेखकांना प्रकाशक 15 टक्क्यांपर्यंत रॉयल्टी देऊ शकतात. सोनिया गांधी आणि पुस्तकाच्या प्रकाशाचा करार गोपनीय आहे, त्यामुळे याविषयीचा अधिकृत आकडा समोर येत नाही. पण ठोकताळ्याप्रमाणे 10 टक्के रॉयल्टी मिळाल्यास 2.60 कोटी रुपये, 12.5 टक्के रॉयल्टी मिळाल्यास 3.25 कोटी रुपये, तर 15 टक्के रॉयल्टी मिळाल्यास 3.90 कोटी रुपये मिळू शकतात. अर्थात हा केवळ अंदाज आहे.

कोणाच्या आग्रहामुळे लिहिले पुस्तक?

सोनिया गांधी यांनी हे पुस्तक का आणि कुणाच्या आग्रहामुळे लिहले याची माहिती दिली आहे. मित्र, गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर पुस्तक लिहण्याचा आग्रह धरत होते. सुरुवातीला आपल्या आयुष्यातील कोलाहल आणि अनुभव मांडण्यास सोनिया गांधी यांना संकोच वाटत होता. पण नंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी त्यांना आग्रह केला. पुढे त्यांनी पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला हे कठीण होते. पण जेव्हा मी लिहिण्यास सुरूवात केली, तेव्हा मात्र लिहिते झाले, असा अनुभव सोनिया गांधी यांनी सांगितला.गांधी कुटुंबियांबद्दल, पती आणि मुलांबाबत समाजात अनेक चुकीच्या गोष्टी आणि अफवा पसरवल्या जातात. या सर्वांना उत्तर देण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाची खरी बाजू लोकांसमोर मांडण्यासाठी हे पुस्तक लिहिल्याचे त्यांनी प्रकाशन सोहळ्यादरम्यान सांगितले.

Follow Us
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाहांना पत्र
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाह आणि राहुल गांधींना पत्र!
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची...
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय...
CM Fadnavis On Water Scarcity : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे...
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे लोक... जरांगे पाटील स्पष्टच बोलले
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी बैठकीत...
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत!
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक प्रकार
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, आता...
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, कारखानदारांनी मागितली 2 दिवसांची मुदत
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील इमारत...
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील मुसाफिरखाना इमारतीवर पालिकेची मोठी कारवाई
शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस! रूपम घुगे...
शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस! रूपम घुगे यांची मोठी घोषणा
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?