AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

International Men’s Day 2026: पुरुष गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात? या 6 गोष्टी जाणून व्हाल थक्क!

International Men's Day 2026: अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पुरुष गुगलची मदत घेतात. गुगलवर ते सर्वाधिक काय सर्च करतात, याबद्दल जाणून घ्या..

International Men's Day 2026: पुरुष गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात? या 6 गोष्टी जाणून व्हाल थक्क!
पुरुष गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात? Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 19, 2026 | 10:40 AM
Share

आज 19 नोव्हेंबर म्हणजेच ‘इंटरनॅशनल मेन्स डे’ (International Men’s Day). जगभरात हा दिवस पुरुषांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पुरुषांसमोरील सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी साजरा केला जातो. पुरुष म्हटलं की अनेकदा कुटुंबाची जबाबदारी, करिअर, आर्थिक नियोजन आणि नात्यांमधील अपेक्षा या गोष्टी डोळ्यांसमोर येतात. पण पुरुषांच्या मनातही अनेक प्रश्न असतात. विशेष म्हणजे, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी अनेकजण गुगलची मदत घेतात. फिट कसं राहायचं, केसगळती कशी थांबवायची, वजन कसं कमी करायचं, पगाराचं नियोजन कसं करायचं, लग्नासाठी योग्य जोडीदार कसा निवडायचा, अशा अनेक विषयांचा पुरुष इंटरनेटवर शोध घेतात.

फिटनेस आणि बॉडी बिल्डिंगला सर्वाधिक पसंती

पुरुषांच्या सर्चमध्ये फिटनेस आणि शरीरयष्टीशी संबंधित विषयांना विशेष महत्त्व आहे. सिक्स पॅक अॅब्स कसे बनवायचे, पोटाची चरबी कशी कमी करायची, मसल्स वाढवण्यासाठी काय खावं, प्रोटीन किती घ्यावं, घरच्या घरी व्यायाम कसा करावा, असे प्रश्न अनेकजण सर्च करतात. जिममध्ये न जाता फिट कसं राहता येईल, याबाबतही पुरुषांना उत्सुकता असते.

केसगळती आणि दाढी-मिशीबाबत चिंता

केसगळती, टक्कल पडणं, केसांची वाढ, दाढी लवकर कशी वाढवावी आणि पांढरे केस काळे कसे करावेत, यांसारखे प्रश्न पुरुषांच्या आवडीचे आहेत. विशेष म्हणजे, पुरुषांच्या ग्रूमिंगविषयक सर्चमध्ये वाढ होत असल्याचे गुगलच्या जुन्या सर्च डेटामध्येही दिसून आले आहे. त्यानुसार पुरुषांच्या ग्रूमिंग सर्चमध्ये 50 टक्के वाढ नोंदवण्यात आली होती.

स्किन केअर आणि स्मार्ट लूक

आता केवळ महिलाच नाही, तर पुरुषही आपल्या त्वचेची काळजी घेण्याबाबत जागरूक झाले आहेत. पुरुषांसाठी सनस्क्रीन, फेसवॉश, मॉइश्चरायझर, सीरम, डार्क सर्कल्स कमी करण्याचे उपाय आणि पिंपल्सपासून सुटका कशी मिळवायची, याचा शोध घेतला जातो. भारतातील पुरुषांच्या पर्सनल केअरविषयक सर्च ट्रेंडमध्ये सनस्क्रीन, सीरम आणि फेस क्लिंझरबाबत वाढती उत्सुकता दिसून आली आहे.

पैसा, नोकरी आणि करिअरचं नियोजन

आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी पुरुष इंटरनेटवर वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेतात. महिन्याला 50 हजार रुपये कसे कमवायचे, घरबसल्या पैसे कसे कमवायचे, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी, म्युच्युअल फंड म्हणजे काय, सरकारी नोकरी कशी मिळवावी आणि परदेशात नोकरीच्या संधी कोणत्या आहेत, असे प्रश्नही सर्च केले जातात.

प्रेम, लग्न आणि नातेसंबंध

पुरुषांच्या सर्चमध्ये नातेसंबंधांशी संबंधित प्रश्नांचाही समावेश होतो. मुलींना कसं इम्प्रेस करावं, पहिल्या डेटला काय बोलावं, लग्नासाठी योग्य जोडीदार कसा निवडावा, ब्रेकअपनंतर स्वतःला कसं सावरावं आणि सुखी वैवाहिक आयुष्याचं रहस्य काय, अशा विषयांबाबत अनेकांना जाणून घ्यायचं असतं.

मानसिक आणि लैंगिक आरोग्याबाबत प्रश्न

पुरुषांच्या आरोग्याशी संबंधित सर्चमध्ये मानसिक तणाव, झोप न येणं, थकवा, हार्मोन्समधील बदल आणि लैंगिक आरोग्याशी संबंधित प्रश्नांचाही समावेश होतो. मात्र, अशा समस्यांवर केवळ इंटरनेटवरील माहितीवर अवलंबून न राहता तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार मानसिक आरोग्याची काळजी घेणं हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची...
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय...
CM Fadnavis On Water Scarcity : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे...
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे लोक... जरांगे पाटील स्पष्टच बोलले
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी बैठकीत...
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत!
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक प्रकार
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, आता...
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, कारखानदारांनी मागितली 2 दिवसांची मुदत
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील इमारत...
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील मुसाफिरखाना इमारतीवर पालिकेची मोठी कारवाई
शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस! रूपम घुगे...
शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस! रूपम घुगे यांची मोठी घोषणा
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ