मला नाटकातून काढून टाकलं, मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, त्या नाटकामुळे…

Marathi Actress Post : सध्या 'आमने सामने' हे नाटक चर्चेत आहे. रोहन गुजर आणि केतकी विलास यांना 'आमने सामने' नाटकातून मानधन वाढीच्या मागणीमुळे काढून टाकण्यात आलं. आता मराठी अभिनेत्रीनंही यासंदर्भात पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट चर्चेत आली आहे.

मला नाटकातून काढून टाकलं, मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, त्या नाटकामुळे...
| Updated on: Oct 30, 2026 | 5:01 PM

मराठी रंगभूमीवरील ‘आमने सामने’ या लोकप्रिय नाटकावरून सध्या मनोरंजनविश्वात मोठी चर्चा सुरू आहे. अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी विलास यांना नाटकातून अचानक काढून टाकण्यात आल्यानं कलाकार आणि निर्माते यांच्यातील वाद समोर आला आहे. मानधनवाढीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या प्रकरणावर मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता अभिनेत्री आरती सोलंकी हिच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

रोहन गुजर आणि केतकी विलास यांची नाराजी

Loading...

रोहन गुजर गेल्या सात ते आठ वर्षांपासून ‘आमने सामने’ या नाटकात काम करत होता, तर केतकी विलास हीदेखील अनेक वर्षांपासून या नाटकाचा भाग होती. मात्र, एका प्रयोगानंतर झालेल्या बैठकीत त्यांना हा शेवटचा प्रयोग असल्याचं सांगण्यात आल्याचा दावा दोघांनी केला होता. नाटकातून अचानक बाहेर पडावं लागल्यानं दोघांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली. अनेक वर्षे नाटकासाठी मेहनत घेतल्यानंतर प्रेक्षकांचा निरोप घेण्याची संधीही मिळाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. रोहन आणि केतकी यांनी मानधनवाढीच्या मागणीमुळे आपल्याला नाटकातून बाजूला करण्यात आल्याचं सांगितलं. त्यानंतर नाटकाचे निर्माते आणि कलाकार मंगेश कदम तसेच अभिनेत्री लीना भागवत यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली. कलाकारांनी पुन्हा मानधनवाढ मागितली होती, मात्र त्यांना अपेक्षित असलेलं मानधन देणं निर्माते म्हणून शक्य नसल्यानं वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणात दोन्ही बाजूंचे दावे समोर आले असून, मानधन आणि कलाकारांशी संवाद साधण्याच्या पद्धतीवरून चर्चा रंगली आहे.

आरती सोलंकीच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

अभिनेत्री आरती सोलंकीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं की. ‘माझं मस्त आहे, मला नाटकातून काढून टाकलं तर मला अजिबातच वाईट वाटलं नाही. उलट, मीच निर्मात्यांना सांगितलं की, माझ्याकडून सगळ्यांना पार्टी. कारण, त्या नाटकामुळे माझा काही ऑस्कर गेला नाही आणि वेळ ठरवते की कोणाचं चांगलं झालं.’

 

आरतीच्या या पोस्टवर कलाकारांनी आणि नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अंकिता वालावलकरने लिहिलं की, ‘तू डेंजर आहेस‘ तर एका युजरने लिहिलं, ‘हा आत्मविश्वास पाहिजे, तू कमाल आहेस’ आरतीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us