AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe : नागरिकांच्या जीवाशी दिवसाढवळ्या खेळ, एक्सपायर अन्नपदार्थ पुन्हा बाजारात! तुकाराम मुंढेंनी ऑर्डरच काढली, आता थेट…

कालबाह्य म्हणजे एक्सापायर्ड झालेले अन्न पदार्थ बाजारामध्ये पुन्हा विक्रीसाठी आणण्यासारखे गंभीर प्रकार सुरु आहेत. राज्यातील या सर्व गुन्हेगारी क्रियांवर लगाम लावण्यासाठी आता एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांची आता काही खैर नाही.

Tukaram Mundhe : नागरिकांच्या जीवाशी दिवसाढवळ्या खेळ, एक्सपायर अन्नपदार्थ पुन्हा बाजारात! तुकाराम मुंढेंनी ऑर्डरच काढली, आता थेट...
tukaram mundhe latest newsImage Credit source: social media
| Updated on: Oct 30, 2026 | 5:03 PM
Share

कालबाह्य झालेले आणि खराब झालेले अन्नपदार्थ नष्ट केल्याचे कागदोपत्री दाखवायचे आणि त्याच अन्नाची पुन्हा पॅकिंग करून बाजारात विक्री करायची, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने अर्थात FDAने महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आदेश काढला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारांविरोधात करण्यात आलेल्या कारवायांमध्ये तब्बल 5 कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून 2 गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

कालबाह्य अन्नपदार्थ पुन्हा बाजारात आणण्याचा प्रकार

तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, कालबाह्य झालेले, खराब झालेले किंवा परत आलेले अन्नपदार्थ योग्य पद्धतीने नष्ट करण्याऐवजी त्यांची केवळ कागदोपत्री विल्हेवाट लावल्याचे दाखवले जाते. प्रत्यक्षात हा माल काही एजंटच्या माध्यमातून पुन्हा बाजारात आणला जातो. त्यानंतर त्याचे पुन्हा पॅकेजिंग करून नागरिकांना विकले जाते. काही ठिकाणी उत्पादनाच्या तारखांमध्येही फेरफार केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकारांना रोखण्यासाठी स्वतंत्र कॉम्प्लायन्स ऑर्डर काढण्यात आली आहे.

माल नष्ट केल्याचा पुरावा देणे बंधनकारक

या नव्या आदेशानुसार कालबाह्य, खराब झालेले आणि परत आलेले अन्नपदार्थ योग्य पद्धतीने नष्ट केल्याचा पुरावा संबंधित कंपनीला द्यावा लागणार आहे. कालबाह्य झालेला माल चांगल्या अन्नपदार्थांपासून वेगळा ठेवणेही आवश्यक आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंद असलेल्या विल्हेवाट लावणाऱ्या कंपन्यांकडून अन्नपदार्थ नष्ट केल्याचे प्रमाणपत्र घेण्याची तरतूदही यामध्ये करण्यात आली आहे. कंपनी छोटी असो किंवा मोठी, कालबाह्य अन्नाची एकही पिशवी पुन्हा बाजारात येणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश मुंढे यांनी दिले आहेत.

10 कारवायांमध्ये 5 कोटींचा साठा जप्त

गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. भिवंडीतील गुलजार नगर परिसरात सुरुवातीला 80 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर 26 लाख रुपयांचा साठाही जप्त करण्यात आला. वडपे परिसरात दोन ठिकाणी कारवाई करून साठा जप्त करण्यात आला, तर संबंधित परवाना निलंबित करण्यात आला. अंबरनाथ आणि पडघा येथेही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत 10 कारवायांमध्ये एकूण 5 कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून 2 गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांमध्ये मालकांची नावेही आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आली असून एकूण 32 आरोपींचा समावेश आहे.

कारवाई हे उद्दिष्ट नाही, यंत्रणा उभी करण्यावर भर

पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे यांनी कारवाई हा अंतिम उद्देश नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, कारवाया वाढल्यामुळे काय फरक पडला, असा प्रश्न विचारला जातो. मात्र कारवाई हे केवळ एक माध्यम आहे. अन्न व्यवसायातील प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित करून नियमांचे पालन करणारी यंत्रणा उभी करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत विविध क्षेत्रांसाठी 22 कॉम्प्लायन्स ऑर्डर काढण्यात आल्या आहेत. हॉटेल, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, शालेय पोषण आहार अशा विविध क्षेत्रांसाठी कोणते नियम पाळणे आवश्यक आहे, हे या आदेशांमधून स्पष्ट करण्यात आले आहे.

Follow Us
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...