दिग्दर्शकासोबत सलमान खान याच्या फार्महाऊसवर गेली मराठी अभिनेत्री, भाईजानने थेट दाखवला चित्रपटातून बाहेरचा, बघता क्षणीच..

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचे फार्म हाऊस कायमच चर्चेत असते. आता नुकताच मोठा खुलासा झाला. सलमान खान याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्याच्या या व्हिडीओमुळे चाहते तणावात होते. सलमान खानच्या फार्म हाऊसवर जाणे एका मराठी अभिनेत्रीला महागात पडले.

दिग्दर्शकासोबत सलमान खान याच्या फार्महाऊसवर गेली मराठी अभिनेत्री, भाईजानने थेट दाखवला चित्रपटातून बाहेरचा, बघता क्षणीच..
Salman Khan farmhouse
| Updated on: Aug 04, 2026 | 4:36 PM

बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. सलमान खान याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि चाहत्यांमध्ये प्रचंड चिंता वाढली. सलमान खानचे वजन प्रचंड कमी झाले, त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसल्या. ज्यानंतर सलमान खान गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचीही तूफान चर्चा रंगली. सलमान खानने स्वत: स्पष्टीकरण दिले. सलमान खान याचे पनवेलचे फार्म हाऊस कायमच चर्चेत असते. जास्तीत जास्त काळ सलमान खान तिथे राहतो. एखाद्या 5 स्टार हॉटेललाही हे फार्म हाऊस मागे टाकते. सलमान खानच्या अत्यंत जवळच्या मित्र मैत्रिणींनाच तिथे प्रवेश आहे. एक मराठी अभिनेत्री थेट दिग्दर्शकासोबत सलमान खान याच्या फार्महाऊसवर पोहोचली आणि तिला सलमान खान याने चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला. हा मोठा झटका अभिनेत्रीसाठी होता.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून मृणाल ठाकुर आहे. मृणाल ठाकुर अली अब्बास जफर यांच्यासोबत सलमान खान याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर गेली होती. तिथे सलमान खान याने तिला बघितले आणि सुलतान चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला. त्याठिकाणी सलमान खान याने अनुष्का शर्मा हिला संधी दिली. सुलतान चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर मृणाल ठाकुर हिने म्हटले होते की, अनुष्का आता चित्रपटात दिसत नाही.

मी आजही काम करते. हे माझ्यासाठी माझे मोठे यश आहे. सहजासहजी मिळणारा आनंद तो आनंदच नसतो. कारण तो सहजासहजी मिळतो तो आनंद फार काळ टिकत नाही. सलमान खान याने मृणाल ठाकुर हिला चित्रपटाबाहेर काढण्याचेही मोठे कारण आहे. सलमान खान याने ज्यावेळी पनवेलच्या फार्म हाऊसवर मृणाल ठाकुर हिला बघितले होते, त्यावेळी त्याला ती खूपच जास्त बारीक दिसली.

सलमान खान याला इतकी बारीक अभिनेत्री चित्रपटात नको होती. त्यामुळे सलमान खान याने तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला आणि अनुष्का शर्मा हिला संधी दिली. अली अब्बास जफर यांच्यासोबत सलमान खान याच्या फार्महाऊसवर जाणे मृणाल ठाकुर हिला महागात पडले. सुलतान हा मोठा चित्रपट होता, त्यामधून बाहेरचा काढणे म्हणजे कोणालाही धक्का बसेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us