AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1‍0 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा ‘हे’ सर्वोत्तम 5G स्मार्टफोन, जाणून घ्या त्यावरील बँक ऑफर्स

बँकेच्या ऑफर्समुळे तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक उत्तम 5G स्मार्टफोन्स खरेदी करू शकता. जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर या डील्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. चला तर मग आजच्या लेखात या डिल्सबद्दल जाणून घेऊयात.

1‍0 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 'हे' सर्वोत्तम 5G स्मार्टफोन, जाणून घ्या त्यावरील बँक ऑफर्स
smartphoneImage Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 04, 2026 | 5:43 PM
Share

तुम्ही जर 10 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीचा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ असू शकते. स्वातंत्र्य दिनाच्या सेलच्या आधी अनेक स्मार्टफोन्सवर बँक ऑफर्स आणि इन्स्टंट डिस्काउंट्स मिळत आहेत, ज्यामुळे त्यांच्या किमती आणखी कमी होत आहेत. तर यामध्ये मोटो जी34 5G, पोको एम6 5G, रेडमी 13सी 5G आणि लावा ब्लेझ 2 5G सारख्या फोन्सचा समावेश आहे. या फोन्समध्ये 5G सपोर्ट, हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि पॉवरफूल बॅटरी यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.

10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेले सर्वोत्तम स्मार्टफोन

स्वातंत्र्य दिनाच्या सेलच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर अनेक बजेट स्मार्टफोन्सच्या किमती बदलल्या आहेत. बँक ऑफर्स आणि इन्स्टंट डिस्काउंटमुळे अनेक 5G स्मार्टफोन्स 10 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतात. जर तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आताच या काही डीलबद्दल जाणून घेणे फायदेशीर ठरू शकते. मात्र खरेदी करण्यापूर्वी अधिकृत विक्रेते, वॉरंटी आणि SAR व्हॅल्यूज नक्की तपासा.

या स्मार्टफोन्सवर उत्तम ऑफर्स उपलब्ध आहेत

मोटो जी34 5जी

मोटो जी34 5जी ची किंमत 10 हजार 999 रूपये आहे, पण बँक ऑफर्समुळे हा फोन तुम्ही 9 हजार 999 रूपयांमध्ये खरेदी करू शकता. जुना फोन एक्सचेंज केल्यास त्याची प्रभावी किंमत सुमारे 7 हजार रूपये इतकी होऊ शकते. या फोनमध्ये स्वच्छ सॉफ्टवेअरचा अनुभव मिळतो आणि बॉक्समध्ये चार्जरचाही समावेश आहे.

पोको एम6 5जी

पोको एम6 5जी कोणत्याही एक्सचेंज ऑफरशिवाय 8 हजार 249 रूपयांमध्ये खरेदी करू शकता. याची लाँच किंमत 9 हजार 499 रूपये आहे. यामध्ये 5जी सपोर्ट आणि बॉक्समध्ये चार्जर मिळतो ज्यामुळे कमी किमतीत एक उत्तम फोन खरेदी करणे योग्य पर्याय ठरतो.

रेडमी 13सी 5जी

बाजारात Redmi 13C 5G ची किंमत 10 हजार 499 रूपये आहे. बँक ऑफरनंतर हा फोन तुम्ही 9 हजार 499 रूपयांमध्ये खरेदी करता येईल. त्यामुळे कमी बजेटमध्ये 5G स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

लावा ब्लेझ2 5जी

लावा ब्लेझ 2 5G ची किंमत 9 हजार 999 रूपये आहे, पण बँक ऑफरनंतर त्याची प्रभावी किंमत 8 हजार 999 रूपये होते. यात 5G सपोर्ट देखील आहे आणि बजेट सेगमेंटमध्ये हा एक चांगला पर्याय मानला जातो.

फोन खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

आजकाल बजेट स्मार्टफोन्समध्येही 90Hz किंवा 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, 5G सपोर्ट आणि अधिक स्टोरेज यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात. काही 4G मॉडेल्समध्ये उत्तम कॅमेरे आणि अधिक रॅमदेखील मिळते. जर तुम्ही नो-कॉस्ट EMI चा पर्याय निवडत असाल तर प्रोसेसिंग फी आणि इतर अतिरिक्त शुल्क तपासायची खात्री करा. वेळेवर डिलिव्हरी आणि स्टॉकची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी खरेदीची वेळ ठरवणे देखील उत्तम आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...