AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना रणौत खासदारकीचा राजीनामा द्या अन्… काँग्रेस नेत्याच्या टीकेने एकच खळबळ; संघाचं नाव घेत हल्लाबोल!

Kangana Ranaut : प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार कंगणा रणौत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर आता एका काँग्रेस नेत्याने भाष्य केले आहे.

कंगना रणौत खासदारकीचा राजीनामा द्या अन्... काँग्रेस नेत्याच्या टीकेने एकच खळबळ; संघाचं नाव घेत हल्लाबोल!
Kangana Ranaut RSSImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 04, 2026 | 5:56 PM
Share

प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार कंगणा रणौत या वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. कंगणाने म्हटले होते की, ‘समाज इतरांच्या अशाच निर्णयांना स्वीकारतो, मग माझ्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये.’ कंगणा रणौत यांच्या या विधानावर आता काँग्रस नेत्यांनी भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कंगना रणौत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्टार प्रचारक बनावे – अजय राय

कंगना रणौत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर बोलताना उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी म्हटले की, कंगना रणौत यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन संघाच्या प्रचारक बनावे.’ आता यावर कंगणा नेमकं काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपची उलटी गिनती सुरू झाली

अजय राय यांनी दतिया आणि बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकांतील भाजपच्या पराभवावरही भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, ‘भाजपची आता उलटी गिनती सुरू झाली आहे. माता पीतांबरा देवीच्या कृपेने काँग्रेसने दतिया मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. तसेच बांकीपूर मतदारसंघात काँग्रेस समर्थित उमेदवार प्रशांत कुमार विजयी झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे बांकीपूरमध्ये स्वतःच्या बूथवरही पराभूत झाले. आमचा बूथ, सर्वात मजबूत असा दावा करणाऱ्या पक्षाचा बूथ आता सर्वात कमकुवत झाला आहे. या पराभवामुळे देशभरात भाजपची उलटी गिनती सुरू झाली आहे.’

प्रयागराजमध्ये राहुल गांधींचा विद्यार्थ्यांशी संवाद

अजय राय यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचा आवाज या कार्यक्रमांतर्गत कोटा आणि डेहराडूननंतर पुढील संवाद 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता प्रयागराज येथील केपी ग्राउंडवर आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशभरातून लाखो विद्यार्थी राहुल गांधी यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. पुढे बोलताना त्यांनी दान चोरीला विरोध केल्यामुळे खासदार पप्पू यादव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत याला लोकशाहीची हत्या असे म्हटले आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी