Mukta Barve : बांगडीच्या काचा फोडून खाल्ल्यातरी… मुक्ता बर्वे हिच्या बेधडक वक्तव्याची सर्वत्र चर्चा, असं म्हणाली तरी का?
Mukta Barve : अभिनेत्री मुक्ता बर्वे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिने केलेल्या एका बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे... 'बांगडीच्या काचा फोडून खाल्ल्यातरी...', असं अभिनेत्री का म्हणाली जाणून घ्या...

Mukta Barve : ‘जोगवा’, ‘मुंबई – पुणे – मुंबई’, ‘सावर रे’, ‘वेडिंगचा शिनेमा’, ‘डबलसीट’, ‘नाच ग घुमा’, ‘माया’, ‘आपडी थापडी’ अशा अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मुक्त बर्वे तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, बेधडक वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने 10 वर्षात इंडस्ट्री आणि निर्मिती क्षेत्रात झालेल्या बदलांबद्दल एवढंच नाही तर प्रसिद्धीबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
मुक्ता बर्वे स्पष्ट म्हणते, ‘मला काम करणं आणि प्रसिद्ध होणं या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे, मी बांगडीच्या काचा फोडून खाऊन दाखवल्या तरी मी एका रात्रीत प्रसिद्ध होऊ शकणार आहे आणि मी काम करता करता इमोट करुन दाखवलं तरी मी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे प्रसिद्धी हा फार वेगळा भाग आहे आणि त्याचा कलेशी पूर्ण संबंध नाहीये.’
‘कोणत्याही गोष्टीची चांगली किंवा वाईट प्रसिद्धी असूच शकते… हे आपण म्हणतोच, पण तुम्ही चांगली गोष्ट करताय, मी माझ्या पुरता कला सादर करीन तर त्याचा काहीच उपयोग नाही आज. त्यामुळे हातात हात घालून जायला पाहिजे. त्यामुळे मी 10 वर्षांपूर्वी नाटक प्रॉड्यूज केलं होतं… ‘कोडमंत्र’ नावाचं त्यानंतर आज पुन्हा मी निर्माती म्हणून उभी आहे. त्या मधल्या 10 वर्षाच्या काळात गोष्टी एवढ्या बदलल्या आहेत की, फक्त मी नाटक करुन थांबू शकत नाही. नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागत आहेत.’
पुढे अभिनेत्री म्हणतेय, ‘नाटक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध मार्ग वापरावी लागत आहेत आणि ते दुधारी शस्त्र आहे. ते चांगलं वापलं तर चांगलं, भयंकर वापरलं तर भयंकर… त्याच्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागतो, वेगळा पैसा द्यावा लागतो. कारण तेथूनच तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहात.’ असं देखील अभिनेत्री मुक्त बर्वे म्हणाली.
मुक्ता बर्वे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.