‘ते सडलेलं अन्न मांसाहाराच्या….’ नॉनवेज खाण्याबद्दल प्राजक्ता माळीचं मोठं वक्तव्य, स्पष्टच म्हणाली, “सडलेल्या गोष्टी तुमच्या…”

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या स्षष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तसेच ती तिच्या आहाराबद्दल, तिच्या डाएटबद्दल नेहमीच बोलताना दिसते. अशाचपद्धतीने प्राजक्ताने मांसाहार खाण्याबद्दल जे वक्तव्य केलं होतं ते प्रचंड व्हायरल झालं. तसेच तिने कोणत्या गोष्टी आहारात टाळल्या पाहिजेत, ती कोणत्या सवयी पाळते हे देखील तिने सांगितले होते.

ते सडलेलं अन्न मांसाहाराच्या.... नॉनवेज खाण्याबद्दल प्राजक्ता माळीचं मोठं वक्तव्य, स्पष्टच म्हणाली, सडलेल्या गोष्टी तुमच्या...
Prajakta Mali
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 15, 2025 | 3:05 PM

मराठीमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. प्राजक्ता तिच्या वैयक्तिक तसेच तिच्या अभिनयाबद्दल नेहमीच चर्चेत असते. तसेच प्राजक्ता स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखली जाते. ती कोणत्याही विषयावर न संकोचता तिचे मत स्पष्टपणे मांडते. प्राजक्ता अनेक मुलाखतींनमध्ये तिच्या अध्यात्मिक प्रवासाबद्दलही सांगत असते. तसेच तिच्या विविध ठिकाणी फिरण्याच्या आवडीबद्दलही ती नेहमी बोलताना दिसते. त्याचपद्धतीने प्राजक्ताने मुलाखतीमध्ये नॉनवेज खाण्याबद्दलचा खुलासा केला होता. तिने केलेलं वक्तव्य बरंच व्हायरलही झालं होतं.

प्राजक्ता माळीने मांसाहाराबद्दल बोललेलं वक्तव्य व्हायरल का होत आहे?

मांसाहार की शाकाहार यावर अनेक तर्क-वितर्क काढले जातात. अगदी सामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येकाचे वेज आणि नॉनवेजबद्दल वेगवेगळी मते आहेत. अनेक सेलिब्रिटी नॉनवेजप्रेमी आहेत, काही वेजप्रेमी तर काहीजण व्हिगन आहेत. अशातच मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने प्रेक्षकांना दिलेला एक सल्ला चर्चेचा विषय ठरला आहे. तिने केलेल्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एका मुलाखतीमध्ये प्राजक्ता माळीला तिचा आहार-विहार, दैनंदिन आयुष्याविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा तिने तिचे डाएटचे सिक्रेटही सांगितले होते तसेच ती मांसाहारी आहे की शाकाहारी हे देखील सांगितले होते. तसेच तिने यावेळी मांसाहार खाण्याबद्दल देखील एक मत मांडलं होतं जे प्रचंड व्हायरल झालं होतं.


असं सडलेलं अन्न मांसाहाराच्या रुपात खातात….

तिने म्हटलं होतं की, ” वास्तविक मांसाहार हा माणसांसाठी बनलेलाच नाही. मांसाहार पचायला 72 तास लागतात. त्यामुळे तुमच्या शरीरात तब्बल 72 तास मांसाहार तसाच राहतो. कोणताही जीव मृत पावल्यानंतर त्याच क्षणापासून त्याचं शरीर सडायला लागतं आणि असं सडलेलं अन्न मांसाहाराच्या रुपात आपण खात असतो. सडलेल्या गोष्टी तुमच्या शरीरात असल्यामुळे अशा अन्नाचा तुमच्या Nervous Systemवर आणि आचार-विचारावर नक्कीच परिणाम होतो.”

आहाराबाबत प्राजक्ता या दोन गोष्टी प्रकर्षाने पाळते 

तसेच प्राजक्ताने सांगितले होते ती आहाराबाबत कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या प्रकर्षाने पाळते. ती म्हणाली होती की “मी दोन गोष्टी प्रकर्षाने पाळते. एक म्हणजे उत्तम खाणं आणि दुसरं उत्तम दिनचर्या. या दोन्ही गोष्टी फॉलो केल्याच पाहिजेत. तुम्ही जे अन्न खाता त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. तुम्ही मैदा जास्त प्रमाणात खात असाल तर तुम्ही मैद्यासारखेच होणार. त्यामुळे शिळ पॅकेज फूड वगैरे खाऊ नका. जेवढं ताज अन्न खाता याल तेवढं तुम्ही खा. त्यामुळे तजेलदारपणा तुमच्या चेहऱ्यावर येईल. शक्य तेवढं लवकर झोपून पहाटे लवकर उठणं गरजेचे आहे. रात्री दोन तीन वाजेपर्यंत जागून तुम्ही सुंदर दिसाल असं वाटत असेल तर ते शक्य नाही. या सगळ्यात व्यायाम देखील तेवढाच महत्त्वाचा आहे.” अशा पद्धतीने तिने हेल्थी टीप्सही दिल्या.