
मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी ‘राधा’ अर्थात अभिनेत्री श्रुती मराठे (Actress Shruti Marathe) ही मनोरंजन विश्वाबरोबरच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असलेली ही मराठमोळी अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करतेय.

अभिनयाच्या वेडापायी श्रुतीने मुंबई गाठली. यानंतर तिला पहिल्यांदा तामिळ चित्रपटात संधी मिळाली. या चित्रपटात तिच्या अभिनायचे खूप कौतुक झाले.

मनोरंजन विश्वात पदार्पण करताना श्रुतीने आपलं नाव ‘हेमामालिनी’ असं केलं होतं. मात्र, नंतर तिने आपलं नाव श्रुती प्रकाश असं केलं. दक्षिणात्य मनोरंजन विश्वात आजही श्रुती ‘श्रुती प्रकाश’ या नावानेच ओळखली जाते.

श्रुती मराठेने ‘सनई-चौघडे’ या चित्रपटातून मराठीत पदार्पण केले. तिची या चित्रपटातील छोटीशी भूमिका देखील चाहत्यांच्या लक्षात राहिली. यानंतर श्रुती अनेक मराठी चित्रपटात झळकू लागली. छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘राधा ही बावरी’ या मधून तिला खरी ओळख मिळाली.