Usha Nadkarni : लाल्या लावून माझे ओढ कधीच पोपटाची चोच…. उषा नाडकर्णी असं का म्हणून गेल्या?

Usha Nadkarni : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. वयाच्या 80 व्या वर्षी देखील त्या तितक्याच उत्साहाने काम करतात. दरम्यान एका मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी असं वक्तव्य केलं, जे आजही चर्चेत आहे.

Usha Nadkarni : लाल्या लावून माझे ओढ कधीच पोपटाची चोच.... उषा नाडकर्णी असं का म्हणून गेल्या?
Usha Nadkarni
| Updated on: Nov 29, 2026 | 11:51 AM

Usha Nadkarni : ‘लाल्या लावून माझे ओढ मी कधी पोपटाची चोच करत नाही. डोळे मी कधी रंगवले नाहीत…’, उषा नाडकर्णी असं का म्हणाल्या असा प्रश्न तुम्हाला देखील नक्कीच पडला असेल. सांगायचं झालं तर, मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री उषा नाडकर्णी फक्त त्यांच्या अभिनयामुळेच नाही तर, बेधडक वक्तव्यांमुळे देखील कायम चर्चेत असतात. एका मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी मोठं वक्यव्य केलं होतं. त्या कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

मुलाखतीत इंडस्ट्रीतील कृत्रिम मुखवटे चढवत प्रेक्षकांसमोर येतात. पण तो मुखवटा उतरवल्यानंतर फार कमी माणसं अशी असतात जी खरं बोलतात. यावर उषा स्पष्टच म्हणाल्या की, आज इतक्या वर्षांपासून, शाळेत असल्यापासून काम करत आहे. आता मी 80 व्या वर्षात एन्ट्री केली आहे. तुम्हाला कधी असं ऐकू आलं आहे का, ही बाई खोटं बोलत आहे… किंवा ही नाटक, सिनेमात काम करणारी म्हणून नटून थटून मी कधीच आली नाही. कुठेही कार्यक्रमासाठी गेली तरी मी अशीच असते. लग्नात गेली तरी मी अशीच असते.

Loading...

लाल्या लावून माझे ओढ मी कधी पोपटाची चोच करत नाही. डोळे मी कधी रंगवत नाही. अभिनय करतानासुद्धा मी ओढांना लाली लावत नाही. पुढे विनोदी अंदाजात उषा म्हणाल्या, आता मी जराशी लावली आहे. म्हणजे असं वाटतं अरे वा… जरा गुलाबी केलं…. मी कधीच असं करत नाही. माझ्या घरी तुम्ही मला बघाल मी गाऊनमध्ये असते. मी व्हीआयपी, सेलिब्रिटी आहे… असं कधीच नाही, मी गाऊन घालते. कोणी येणार असेल तर, सांगते यायच्या आधी कळवा, म्हणजे मी पंजाबी ड्रेस घालून बसेल…

पुढे उषा नाडकर्णी  म्हणाल्या, ‘आपल्या घरातल्या बायता कशा असतात, मी देखील त्यांच्यासारखीच साधी असते. माझ्याकडे ते नखरे नाहीत. मला नखरे येत नाहीत. कुठेही कार्यक्रमात गेले, तर शेठाणी म्हणून मी कधीच पुढे बसायला जात नाही. लोकं बसतात तशी मी मागे बसते. पुढे ये म्हटलं तरी मी पुढे जात नाही. ‘, असं देखील उषा नाडकर्णी म्हणाल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us