
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदार या कायमच काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. सध्या दमयंती दामले या नाटकात झळकताना दिसत आहेत. त्यासोबतच त्या शुभविवाह या मराठी मालिकेतही काम करताना पाहायला मिळत आहे. विशाखा सुभेदार यांनी त्यांच्या व्यस्त जीवनातून वेळ काढत गिरनार पर्वताची आव्हानात्मक आणि आध्यात्मिक यात्रा पूर्ण केली आहे. विशाखा सुभेदार यांनी ही यात्रा पूर्ण झाल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ही यात्रा कशी झाली याबद्दलची माहिती दिली आहे.
विशाखा सुभेदार या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच विशाखा सुभेदार यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत विशाखा सुभेदार या गिरनार पर्वताच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत. या पायऱ्या चढून तिने बाबा गिरनारींचे दर्शन घेतले. यावेळी तिच्यासोबत तिचे पती, अभिनेते पंढरीनाथ कांबळी यांनीही गिरनारची यात्रा केली.
गिरनार यात्रा..बाबा गिरनारी दर्शन झाले ते “भरत बलवल्ली “ह्या माझ्या बंधू मुळे.. हे सगळं शक्य झालं आमच्या देवमाणसामुळे.. तो म्हणाला कीं “मी आहे चल, आणि त्यांना आहे कीं काळ्जी ” आधी द्वाराका जाऊ, मग सोमनाथ आणि मग गोरक्षनाथ आणि गिरनार. द्वारकेला ध्वजारोहण सोहळा झाला, त्याचा नावाचा ध्वज फडकतो दरवर्षी द्वारकाधीश मंदिरावर..! मग रुख्मिणी दर्शन, भेट द्वाराका सुदामा कृष्ण भेट स्थळ, नागेश्वरमंदिर,हे सुद्धा केवळ त्याच्यामुळेच झालं. .आणि मग आम्ही निघालो गिरनार.
आयुष्यात मला कधीच वाटलं नव्हतं मी ह्या इतक्या पायऱ्या चढेन.. जेमतेम 10/15 पायऱ्या चढणारी मी 5000 पायऱ्या चढले.. पाय थरथरत होतें, गुढघे बोलत होतें.. पण नाम काळजात मुखात सुरुच होत.. महाराजांनी करवून घेतले..! अवघड वाट सोपी केली.. 5000 पायऱ्या रोपवे, आधीच त्यांनी सोय केली होतीच.. अर्धा गड ते स्वतः आलेच कीं आपल्याला घेऊन जायला आता राहिला अर्धा, करू कीं पार..! डोली केली होती, समजा नाहीच झेपलं तर म्हणून, पण देवाच्या कृपेनें गरज नाही लागली.. तो ही बिचारा डोली वाला मला सांगत होता “थोडा ही रेहे गया..” मला सोबत आणि प्रोत्साहन देत होता.. आधी म्हणत होता, डोली चढो पण माझी ईच्छा बघून शेवटी त्यानीही मनाची शक्ती वापरायला मदतच केली.
दर्शन झाल्यावर गड उतरताना मात्र एक टप्प्यात वापरावी लागली कारण गुडघा साथ देईना झाला.. त्या गुडघ्याला बिच्याऱ्याला सॉरी आणि इथवर साथ दिली म्हणून thank u म्हटले आणि डोली घेतली.. त्या माणसांची देखील कमाल आहे बाई.. हे एवढं ओझं घेऊन चढा उतरायचंय सोपं नव्हेच, असाही अनुभव विशाखा सुभेदारने सांगितला.
दर्शन.. खरंच ती दोन मिनिट दर्शनाची…डोळे भरले, मन तृप्त झालं, काळजात देव भरला.. डोळ्यात भाव भरला, मनात प्रेम भरलं, आणि देव मायेची शिदोरी भरून घेतली.. अन्नछत्र मधला प्रसाद तिथलं पाणी आणि शिस्त सगळंच भारावून टाकणार.. पेटती धुनी.. अंबाजी. सगळी दर्शन मनोभावे केली.. आणि तिथून निघताना खरंच पाऊल नव्हतं पडत. हट्टाने,आज राहते कीं गडावर असंच वाटतं होतें..! बाबा गिरनारी भेटला.. हे सहा दिवस.. मंत्र श्लोक जप ध्यान करीत करीत फक्त तुझ्यातच, माझ्यामाझ्यातच होतें मी. आणि एक मज्जा म्हणजे, हा प्रवास आम्ही माझ्या गाडीने केला.. ते सुद्धा एक वेगळं थ्रील असतं.. माझा नवरा महेश,मी आणि पॅडी सगळेच drive करणारे, मज्जेत झाला प्रवास..!, असे विशाखा सुभेदारने म्हटले आहे.