Sarsenapati Hambirrao: ‘अंगावर काटा येणं, रक्त सळसळणं..’; ‘सरसेनापती हंबीरराव’साठी अमृता खानविलकरची खास पोस्ट

| Updated on: May 30, 2022 | 1:40 PM

प्रेक्षक-समीक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून मराठी कलाविश्वातील काही कलाकारांनीही यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. त्यापैकीच अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.

Sarsenapati Hambirrao: अंगावर काटा येणं, रक्त सळसळणं..; सरसेनापती हंबीररावसाठी अमृता खानविलकरची खास पोस्ट
सरसेनापती हंबीरराव या चित्रपटासाठी अमृता खानविलकरची पोस्ट
Image Credit source: Instagram
Follow us on

प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षक-समीक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून मराठी कलाविश्वातील काही कलाकारांनीही यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. त्यापैकीच अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. ‘चित्रपट बघत असताना अंगावर काटा येणं, रक्त सळसळणं, सतत वाह वाह म्हणणं, टाळ्या वाजवणं अशा गोष्टी क्वचितच करायला अनुभवायला मिळतात. सरसेनापती हंबीरराव बघून हे सगळं तुम्हालाही होईल,’ असं तिने या पोस्टमध्ये लिहिलंय. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठ्यांच्या इतिहासातील एक सोनेरी पान उलगडण्यात आलं आहे.

अमृता खानविलकरची पोस्ट-

‘चित्रपट बघत असताना अंगावर काटा येणं, रक्त सळसळणं, सतत वाह वाह म्हणणं, टाळ्या वाजवणं अशा गोष्टी क्वचितच करायला अनुभवायला मिळतात. सरसेनापती हंबीरराव बघून हे सगळं तुम्हालाही होईल. प्रवीण तरडे ज्या ताकदीचे दिग्दर्शक आहेत त्याचप्रामाणे एक ताकदीचे कलाकारसुद्धा आहेत आणि हा चित्रपट ते साध्य करतो. त्याचबरोबर त्यांची रिअल आणि रिल लाइफ पत्नी.. तिला मी आता लक्ष्मीच म्हणणार आह्ह्ह्ह काय काम केलंय वाहहहहह! गश्मीर महाजनी, माय ब्रदर तुझ्याविषयी काय बोलू? ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज’ म्हणून तुझं वावरणं, तुझं बोलणं, तुझे डोळे, प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य नुसता काळजावर घाव! श्रुती मराठे तुला आजवर असं पाहिलं नाही गं, उत्कृष्ट कामगिरी. या सगळ्यांसोबत महेश लिमये यांची सिनेमॅटोग्राफी म्हणजे लाजवाब! उमेश जाधव तुला तोड नाही आणि मला मनापासून कौतुक करायचंय ते म्हणजे या फिल्मच्या प्रोड्युसर्सचं. ऐतिहासिक चित्रपट दिसावा कसा तर असा. अफलातून प्रॉडक्शन व्हॅल्यू,’ अशा शब्दांत तिने चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

प्रवीण तरडेंनीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. त्याचसोबत त्यांनी दिग्दर्शनाचीही जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सेनापती होते. चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी स्वराज्याला श्रीमंती मिळवून देण्यास मोठी मदत केली होती. या चित्रपटात हंबीररावांच्या नजरेतून मराठा साम्राज्य प्रेक्षकांच्या पहायला मिळणार आहे.