AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“Sanjay Raut यांची कॉमेंट्री अजूनही..”, आरोह वेलणकरचा उपरोधिक टोला

आरोहच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'बडबडणार्‍या कासवाची गोष्ट माहीत असेल ना...तेच होईल शेवटी,' असं एका युजरने लिहिलं. तर 'स्वर यंत्रणेला चिरंजीव असण्याचा वरदहस्त असेल, घसा दमत नाही आणि दमही घेत नाही,' असं दुसऱ्याने म्हटलं.

Sanjay Raut यांची कॉमेंट्री अजूनही.., आरोह वेलणकरचा उपरोधिक टोला
Aroh Welankar and Sanjay RautImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 05, 2022 | 12:30 PM
Share

विधानसभेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारवरील विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 मतांनी मंजूर झाला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या सर्व घडामोडींनंतर आज (मंगळवारी) सकाळी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानाची खिल्ली उडवली. तर शिवसैनिक इरेला पेटला आहे. त्यामुळे आता निवडणुका झाल्या तर आम्ही 100 हून अधिक जागा नक्कीच जिंकू, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. एकंदरीत त्यांच्या या वक्तव्यांवर अभिनेता आरोह वेलणकरने (Aroh Welankar) उपरोधिक टोला लगावला आहे. आरोहने ट्विट करत संजय राऊत यांना टोमणा मारला आहे.

‘संजय राऊत यांची कॉमेंट्री अजूनही थांबतच नाहीये’, असं लिहित आरोहने हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि इतर राजकीय, सामाजिक घडामोडींवर आरोह ट्विटरच्या माध्यमातून सातत्याने व्यक्त होताना दिसतो. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडींबाबत त्याने बऱ्याचदा ट्विट केलं होतं. विविध विषयांवर सोशल मीडियावर मोकळेपणे व्यक्त होणाऱ्या मराठी कलाकारांमध्ये आरोहचं नाव आवर्जून घेतलं जातं. आपल्या पोस्टद्वारे तो कधी सडेतोड तर कधी उपरोधिक टोला लगावतो. असाच उपरोधिक टोला आता त्याने संजय राऊतांना लगावला आहे.

आरोहचं ट्विट-

आरोहच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘बडबडणार्‍या कासवाची गोष्ट माहीत असेल ना…तेच होईल शेवटी,’ असं एका युजरने लिहिलं. तर ‘स्वर यंत्रणेला चिरंजीव असण्याचा वरदहस्त असेल, घसा दमत नाही आणि दमही घेत नाही,’ असं दुसऱ्याने म्हटलं. ‘अजून पण 11 आमदार बाकी आहेत. जोपर्यंत सगळे शिंदे गटात नाही जाणार तोपर्यंत चालू राहिले पाहिजे,’ असा टोलाही एका युजरने राऊतांना लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर राऊतांची प्रतिक्रिया

“काल मी प्रवासात होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं नाही. पण आज ते वाचलं. त्यांच्या भाषणात काही नवीन नाही. सोडून गेलेला प्रत्येक व्यक्ती असंच बोलत असतो. आपलीच बाजू मांडत असतो. मीच कसा खरा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. नारायण राणे सोडून गेले, तेव्हा विधानसभेत ते असंच बोलले होते. छगन भुजबळ सोडून गेले तेव्हा तेही याच पद्धतीने बोलले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू मांडली असेल तर त्यात काही नवीन नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.