Daagdi Chaawl 2: डेझी शाहची मराठीत धमाकेदार एण्ट्री; ‘दगडी चाळ 2’ मधील गाण्यावर धरला ठेका

| Updated on: Aug 07, 2022 | 2:11 PM

'राघू पिंजऱ्यात आला' (Raghu Pinjryat Ala) असे या गाण्याचे बोल असून डेझी शाह (Daisy Shah) या बॉलिवूडमधील नामांकित चेहऱ्याने या गाण्याच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.

Daagdi Chaawl 2: डेझी शाहची मराठीत धमाकेदार एण्ट्री; दगडी चाळ 2 मधील गाण्यावर धरला ठेका
Daagdi Chaawl 2: डेझी शाहची मराठीत धमाकेदार एण्ट्री
Image Credit source: Youtube
Follow us on

‘दगडी चाळ 2’ (Daagdi Chaawl 2) हा चित्रपट येणार असल्याचं समजल्यापासूनच यातील प्रमुख व्यक्तिरेखा कोण साकारणार याची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती आणि नुकतेच यातील प्रमुख चेहरे प्रेक्षकांसमोर आले. आता या चित्रपटातील पहिले आणि जबरदस्त गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. ‘राघू पिंजऱ्यात आला’ (Raghu Pinjryat Ala) असे या गाण्याचे बोल असून डेझी शाह (Daisy Shah) या बॉलिवूडमधील नामांकित चेहऱ्याने या गाण्याच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. अमितराज यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला मुग्धा कऱ्हाडे हीचा आवाज लाभला आहे. तर अवघ्या बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवणाऱ्या आदिल शेख यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.

गाण्याचे भन्नाट बोल, डेझीचा सिझलिंग परफॉर्मन्स आणि घायाळ करणाऱ्या तिच्या अदा या सगळ्यामुळे हे गाणे ग्लॅमरस बनले आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ 2’ येत्या 18 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या गाण्याबद्दल निर्मात्या संगीता अहिर म्हणतात, “जेव्हा या गाण्याचा आम्ही या चित्रपटात समावेश करण्याचे ठरवले, तेव्हा सर्वात आधी माझ्यासमोर डेझी शाहचा चेहरा आला. याबाबत आम्ही तिला विचारणा केली आणि तिनेही त्वरित होकार दिला. हिंदी चित्रपटातील अभिनेत्रीने मराठी पडद्यावर काम करायला इतक्या लगेच होकार देणे, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. गाण्याची टीमच इतकी अफलातून आहे की, हे गाणे, डेझीचे नृत्य प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे आहे.”

पहा गाणं-

हे सुद्धा वाचा

संगीतकार अमितराज या गाण्याबद्दल म्हणतात, “क्षितिज पटवर्धन यांनी गाण्याचे बोल इतके उत्स्फूर्त लिहिले की, त्याला संगीतही त्याच ताकदीचे लागणार होते. मुग्धानेही या गाण्याला उत्तम न्याय दिला आहे आणि मात्र त्यात अधिक रंगत आणली आहे ती डेझीच्या बहारदार नृत्याने. हे गाणे ऐकताना कोणाचेच पाय जमिनीवर स्थिर राहू शकत नाहीत. सगळ्यांना ठेका धरायला लावणारे हे गाणे आहे.” या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.