‘माझं अजूनही तुझ्यावर प्रेम…’, प्रिया बापट-उमेश कामतच्या क्यूट व्हिडीओवर चाहतेही फिदा!

मराठी इंडस्ट्रीतील गोड आणि हटके कपल अशी ओळख असलेले अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) सध्या नवनवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून चाहत्यांची मनं जिंकत आहेत. या जोडीनं रिलपासून ते रिअल लाईफपर्यंत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.

‘माझं अजूनही तुझ्यावर प्रेम...’, प्रिया बापट-उमेश कामतच्या क्यूट व्हिडीओवर चाहतेही फिदा!
Priya Bapat-Umesh Kamat

मुंबई : मराठी इंडस्ट्रीतील गोड आणि हटके कपल अशी ओळख असलेले अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) सध्या नवनवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून चाहत्यांची मनं जिंकत आहेत. या जोडीनं रिलपासून ते रिअल लाईफपर्यंत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. प्रचंड प्रतीक्षेनंतर आपल्या नुकतीच सर्वांची आवडती ऑफस्क्रीन जोडी प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र भेटण्यासाठी आली होती. ‘आणि काय हवं‘च्या (Ani Kay Hava) माध्यमातून जुई आणि साकेत बनून ते आपल्या भेटीला आले होते. ही जोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करत असते.

नुकताच अभिनेत्री प्रिया बापट हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सध्या सोशल मीडियावर सुरु असलेला ट्रेंड फॉलो करताना दिसत आहे. यावेळी अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांनी एकत्र व्हिडीओ तयार केला आहे, ज्यावर ‘I am still in love with you’ असे लिहिले आहे. आपल्या आवडत्या जोडीचा हा क्यूट व्हिडीओ पाहून चाहते देखील या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

नात्यातील नावीन्य टिकवण्यासाठी….

तुम्हाला असे कधी वाटते का, एक ‘कपल’ म्हणून तुम्ही एकमेकांना अनुरूप आहात, तुमचे नाते परिपक्व आहे, एकमेकांना सांभाळून घेता, असा प्रश्न विचारला असता, उत्तर देताना ते म्हणाले की, वैवाहिक जीवनातील सुरुवातीचा काळ हा नेहमीच खास असतो. परंतु जशीजशी वर्षे सरतात, तसे या नात्यातील नावीन्य कमी होऊ लागते. दैनंदिन जीवन सुरु होते. आयुष्यात मजा अशी काही राहातच नाही आणि रटाळ, कंटाळवाणे आयुष्य सुरु होते. अशा वेळी नवरा बायकोच्या नात्यातील मैत्री टिकवून ठेवण्यासाठी आणि या नात्यातील नावीन्य टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधणे किती गरजेचे आहे, याची जाणीव होऊ लागते.

प्रिया आणि उमेशने अलीकडेच त्यांच्या लोकप्रिय वेब सीरीजच्या दुसर्‍या सीझनसाठी एकत्र शूटिंग सुरू केली होती. याशिवाय ते ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या मराठी नाटकासाठी टूर करण्यात व्यस्त होते. या जोडप्याने 2011 मध्ये लग्न गाठ बांधली होती आणि त्यांनी ‘टाईम प्लीज’ या मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते. ‘आणि काय हवं?…’ या वेब सीरीजच्या माध्यमातून उमेशने पहिल्यांदाच वेब विश्वात पदार्पण केले होते. तर, प्रिया बापटची ही दुसरी सीरीज होती. ‘आणि काय हवं?…’चे तिसरे पर्व काहीच दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीस आले आहे.

हेही वाचा :

Thalaivii on Netflix : थिएटरनंतर कंगना रनौतचा ‘थलायवी’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित, ओटीटीवरही दाखवणार जादू!

Sunny Leone : ब्लॅक ड्रेस आणि स्टायलिश अंदाज, मुंबईत संपूर्ण कुटुंबासोबत सनी लिओनी स्पॉट

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI