Mazhi Tuzhi Reshimgaath: नेहाच्या मेहंदीमध्ये आले खास पाहुणे; ओळख पाहू कोण?

नेहा आणि यशाच्या लग्नसोहळ्याचा (Wedding Special) थाट काही वेगळाच आहे. या सोहळ्याच्या आधी सगळे कार्यक्रम देखील अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडणार आहेत.

Mazhi Tuzhi Reshimgaath: नेहाच्या मेहंदीमध्ये आले खास पाहुणे; ओळख पाहू कोण?
Mazhi Tuzhi Reshimgaath
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Jun 08, 2022 | 12:29 PM

माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi Tuzhi Reshimgaath) या मालिकेतील नेहा आणि यशच्या लग्नाची चर्चा सर्वत्र चालू आहे. नुकताच यश आणि नेहाचा साखरपुडा पार पडला. नेहा आणि यशाच्या लग्नसोहळ्याचा (Wedding Special) थाट काही वेगळाच आहे. या सोहळ्याच्या आधी सगळे कार्यक्रम देखील अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडणार आहेत. आता प्रेक्षक मालिकेत पाहू शकतील की साखरपुड्यानंतर यशचे मित्र बॅचलर पार्टी करायचं ठरवतात. शेफालीला याची खबर मिळते. ती समीरवर नजर ठेवण्यासाठी नेहाला तिथे घेऊन जाते. पण काही गैरसमजामुळे यश मुलींच्या गराड्यात अडकलेला नेहा पाहाते आणि रुसून निघून जाते. रुसलेल्या नेहाचा राग घालवण्यासाठी काही खास पाहुणे मेहंदीच्या (Mehandi) कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

मेहंदीच्या कार्यक्रमात डोक्यावर दुपट्टा घेऊन हे पाहुणे नक्की कोण आहेत हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळणार आहे. यशवर्धन चौधरीचं लग्न असल्यामुळे या सोहळ्याचा थाटदेखील तेवढाच मोठा असणार आहे आणि तितकेच कार्यक्रम देखील दिमाखदार असणार आहेत. या आठवड्यात प्रेक्षकांना यश आणि नेहाचा साखरपुडा, यशची बॅचलर पार्टी, मेहंदी, हळद, संगीत पाहायला मिळेल.

पहा व्हिडीओ-

या सगळ्या कार्यक्रमांमध्ये खूप रंजक वळणंदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळतील. माझी तुझी रेशीमगाठ लग्न विशेष सप्ताह सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहेत. त्याचप्रमाणे चिमुकल्या परीनेसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.