Takatak 2: मराठीतल्या बोल्ड चित्रपटाचा सीक्वेल लवकरच; प्रथमेश परबचा ‘टकाटक 2’ येतोय

| Updated on: Jun 17, 2022 | 3:13 PM

'टकाटक'प्रमाणेच 'टकाटक 2'देखील मनोरंजनातून काहीतरी संदेश देणारा असेल असं म्हटलं जातंय. या चित्रपटाचं बरचसं चित्रीकरण गोव्यात झालं असल्यानं गोव्यातील धमाल-मस्ती यात नक्कीच असेल.

Takatak 2: मराठीतल्या बोल्ड चित्रपटाचा सीक्वेल लवकरच; प्रथमेश परबचा टकाटक 2 येतोय
मराठीतल्या बोल्ड चित्रपटाचा सीक्वेल लवकरच
Image Credit source: Instagram
Follow us on

‘टकाटक’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता त्याचा सीक्वेल म्हणजेच ‘टकाटक 2’ (Takatak 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 19 ऑगस्ट रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. पहिल्या भागाचं कथानक आणि त्या माध्यमातून दिलेला संदेश तरुणाईपासून सर्वच वयोगटातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर आता ‘टकाटक 2’मध्ये काय पहायला मिळणार याची उत्सुकता आहे. ‘टकाटक 2’मध्ये प्रथमेश परब (Prathamesh Parab) पुन्हा एकदा मिलिंद कवडे (Milind Kavde) यांच्या चित्रपटाचा नायक बनला आहे. त्याच्यासोबत अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजेशिर्के, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आणि इतर कलाकारांच्याही भूमिका आहेत.

‘टकाटक’प्रमाणेच ‘टकाटक 2’देखील मनोरंजनातून काहीतरी संदेश देणारा असेल असं म्हटलं जातंय. या चित्रपटाचं बरचसं चित्रीकरण गोव्यात झालं असल्यानं गोव्यातील धमाल-मस्ती यात नक्कीच असेल. ‘टकाटक 2’ हा चित्रपट प्रेक्षकांना ‘टकाटक’च्या एक पाऊल पुढे घेऊन जाणारा असल्याचं मिलिंद कवडे यांचं म्हणणं आहे. ‘टकाटक 2’ निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

हे सुद्धा वाचा

प्रथमेश परबची इन्स्टा पोस्ट-

‘टकाटक 2’ची संकल्पना, कथा आणि पटकथा दिग्दर्शक मिलिंद कवडे यांची आहे. तरुणाईला आवडेल असं संवादलेखन करण्याची जबाबदारी किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी पार पाडली आहे. गीतलेखन जय अत्रेनं केलं असून, संगीतकार वरूण लिखतेनं संगीत दिलं आहे. डिओपी हजरत शेख वली यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांचे आहे. निलेश गुंडाळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.