मुस्लिम अभिनेत्याशी लग्न करणं अभिनेत्रीला महागात, धर्म बदलणे ठरली मोठी चूक

ही अभिनेत्री अनेकदा ट्रोलर्सचा बळी ठरली आहे. या अभिनेत्रीने एका मुस्लिम अभिनेत्याशी लग्न केल्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर तिने लग्नानंतर नाव, धर्म बदलल्यामुळे तिला चाहत्यांचा रोष पत्करावा लागला होता.

मुस्लिम अभिनेत्याशी लग्न करणं अभिनेत्रीला महागात, धर्म बदलणे ठरली मोठी चूक
Marrying a Muslim actor cost Deepika Kakkar dearly, changing religion was a big mistake
Image Credit source: instagram
| Updated on: Apr 03, 2025 | 4:24 PM

बॉलिवूड असो किंवा मग टीव्ही इंडस्ट्री अनेक अभिनेत्रींनी मुस्लिम अभिनेत्याशी लग्न केलं आहे. पण त्यावरून या अभिनेत्रींना अनेकदा ट्रोलही करण्यात आलं आहे. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे दीपिका कक्कर इब्राहिम. दीपिका हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने मुस्लिम अभिनेता शोएब इब्राहिमशी लग्न केले. या लग्नापासून त्याला एक मुलगाही आहे. सध्या आनंदी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. ती तिचा मुलगा रुहानच्या संगोपनात व्यस्त आहे.

दीपिका अनेक कारणांनी ट्रोल

दीपिका अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोलिंगचा सामना करतच असते. याचे कारण म्हणजे दीपिकाने शोएबशी लग्न करण्यासाठी तिचा धर्म सोडून इस्लाम स्वीकारला. आता ती नमाज अदा करते. ती रमजानमध्ये उपवास ठेवते. दीपिका युट्यूबवरील व्लॉगद्वारे तिचे दैनंदिन जीवन दाखवते.

लग्नासाठी दीपिकाने तिचा धर्मही बदलला

दीपिकाचे शोएबसोबतचे हे दुसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न 2011 मध्ये रौनक मेहताशी झाले होते. पण त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि तिचा घटस्फोट झाला. यानंतर ती शोएबच्या प्रेमात पडली. तिने 2018 मध्ये शोएब इब्राहिमशी लग्न केलं. हे लग्न शोएबच्या मूळ गावी मौदाहा येथे झालं. या लग्नासाठी दीपिकाने तिचा धर्मही बदलला. शोएबशी लग्न करण्यासाठी दीपिकाने तिचे नाव बदलून फैजा असं ठेवल्याच्या बातम्याही आल्या होत्या. त्यांच्या लग्नाच्या कार्डवर फैजा हे नाव लिहिलेलं होतं. यानंतर दीपिकाला खूप ट्रोलही करण्यात आलं.

दीपिकाला तिच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगी?

यानंतर, दीपिकाला तिच्या ड्रेसिंगसाठीही देखील ट्रोल केलं जातं. जेव्हा ती तिच्या बाळाच्या, रुहानच्या वेळी गर्भवती होती, तेव्हा अशा अफवा पसरल्या होत्या की दीपिकाला तिच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगी आहे, जिला तिने सोडून दिलं आहे. अफवा आणि ट्रोलिंगला कंटाळून, शोएब आणि दीपिका यांनी अखेर या बातमीवर प्रतिक्रिया दिली आणि ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं जात आहे. दीपिका आणि शोएब यांनी या ट्रोलिंगवर म्हटलं होतं. आम्हाला कोणालाही काहीही सिद्ध करायचं नाही. आम्ही एकमेकांसोबत आनंदी आहोत. असं म्हणत त्यांनी एकमेकांवरील प्रेम व्यक्त केलं आहे. दीपिका आणि शोएबच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत आणि दोघेही खूप आनंदी आहेत.