Daler Mehndi: दलेर मेहंदी रडले, मीका सिंगचाही बांध फुटला; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी…त्या प्रकरणात काय घडलं?

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दलेर मेहंदी आणि मीका सिंग यांच्याशी फोनवरून संवाद साधत मंत्र्यांच्या वतीने दिलगीर व्यक्त केली आहे. मीका सिंग यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वभावाचं कौतुक केलं, परंतु मंत्री सुबोध उनियाल यांनी व्हिडिओद्वारे थेट माफी मागावी या मागणीवर ते ठाम आहेत

Daler Mehndi: दलेर मेहंदी रडले, मीका सिंगचाही बांध फुटला; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी...त्या प्रकरणात काय घडलं?
daler mehendi and mika singh
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 24, 2026 | 6:45 PM

गायक दलेर मेहंदी आणि उत्तराखंडचे मंत्री सुबोध उनियाल यांच्यातील वाद सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात दलेर मेहंदी यांचे धाकटे भाऊ आणि गायक मीका  सिंग यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली. दलेर यांच्याशी फोनवर बोलताना ते भावूक झाले होते. असं मीकाने सांगितलं. दुसरीकडे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंत्र्याच्या वतीने माफी मागितल्याचंही मीकाने स्पष्ट केलं. मात्र सुबोध उनियाल यांनी स्वत:दलेर यांची माफी मागावी, अशी मागणी मीकाने केली आहे.

नेमंक काय घडलं?

18 ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमधील नवी टिहरी येथे सिद्धपीठ माँ कुंजापुरी पर्यटन आणि विकास मेळ्याव्यात दलेर मेहंदी यांचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी मंत्री सुबोध उनियाल यांनी मंचावरच थांबवत दलेर मेहंदी यांच्यावर त्यांच्या तब्येतीबद्दल आणि गाण्याच्या सादरीकरणाबद्दलही प्रश्न उपस्थित केले.दलेर मेहंदी नशेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला.

Loading...

मीकाने सांगितले की, त्याला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याने दलेर मेहंदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी मोठ्या भावाला हा प्रसंग सांगताना दलेर भाई भावूक झाले. हे पाहून मीकालाही वाईट वाटलं. दलेर यांची तब्बेत काही काळापासून ठीक नव्हती असंही मीकाने सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

23 ऑक्टोबर रोजी मीका सिंगने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि मंत्री सुबोध उनियाल यांच्या वतीने माफी मागितली. पुढच्या वेळी उत्तराखंडमध्ये आल्यावर दलेर आणि मीका सिंग यांना योग्य सन्मान दिला जाईल असं आश्वासनही दिलं.

मंत्र्याने माफी मागावी ही मागणी कायम

मुख्यमंत्री धामी खूप चांगले आहेत. काही गरज नसताना त्यांची काही चूक नसतानाही त्यांनी माफी मागितली. मात्र मीका ची मागणी अजूनही ठाम आहे सुबोध यांनी दलेर भाईंना कॉल करून माफी मागावी आणि आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण द्यावं. अशी मीका ची मागणी आहे. कलाकराचा सन्मान राखला गेलाच पाहिजे असंही मीकाने म्हटलं आहे. आता सुबोध उनियाल यांच्याकडून यावर पुढे काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us