AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Koffee With Karan 9 : करण जोहरमुळे माझं वजन वाढलं, अभिनेत्रीच्या वक्तव्याने उडाली खळबळ!

Koffee With Karan 9: कॉफी विथ करणच्या पुढल्या एपिसोडमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रीने मोठा, धक्कादायक खुलासा केला आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी असलेल्या या अभिनेत्रीने असा खुलासा केला की, करण जोहरने तिच्याशी बोलणं बंद केल्यावर तिचं चक्क वजन वाढलं होतं

Koffee With Karan 9 : करण जोहरमुळे माझं वजन वाढलं, अभिनेत्रीच्या वक्तव्याने उडाली खळबळ!
| Updated on: Oct 24, 2026 | 6:46 PM
Share

Koffee With Karan 9 : ‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या टॉक शोची सध्या बरीच हवा आहे. या शोचा 9 वा सीजन आला असून तो अखेरचा ठरणार आहे. या सीझनचे दोन भाग रिलीज झाले असून पुढल्या बुधवारी नवा भाग येईल, ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर एकत्र दिसणार आहेत. करणने त्याच्या अपकमिंग एपिसोडचा प्रोमो देखील जारी केला आहे. त्याच्या या चॅट शोचा आगामी एपिसोड मनोरंजनाने भरलेला असणार आहे. शोच्या नव्या प्रोमोमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता वरुण धवन यांची धमाल पाहायला मिळत आहे. दोघेही करण जोहरसोबत जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसले आहेत. त्यांच्यातील मजेशीर संवाद, करणची फिरकी आणि जान्हवीने केलेला एक खास खुलासा यामुळे या एपिसोडची चर्चा रंगली आहे.

करण जोहर म्हणाला, ‘आज येणारे पाहुणे संस्कारी नाहीत!’

नव्या प्रोमोची सुरुवातच धमाकेदार पद्धतीने होते. करण जोहर जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांची ओळख करून देताना मजेशीर अंदाजात म्हणतो की, आज येणारे पाहुणे संस्कारी नाहीत. त्यानंतर जान्हवी आणि वरुणची एंट्री होते. दोघेही करणसोबत गप्पा मारताना आणि त्याची फिरकी घेताना दिसतात. या संवादादरम्यान जान्हवीने करण जोहरसोबतच्या जुन्या वादाचा किस्सा सांगितला. एकदा करणने तिच्याशी बोलणं बंद केलं होतं आणि त्यानंतर आपलं वजन वाढलं होतं, असं तिने गंमतीशीरपणे सांगितलं. तिच्या या वक्तव्यामुळे प्रोमोमधील संवाद अधिक रंगतदार झाला आहे.

‘करणने आमच्याशी बोलणं बंद केलं होतं’, वरुण धवनचा खुलासा

प्रोमोमध्ये वरुण धवनने सांगितलं की, एक वेळ अशी होती, की करण जोहरने त्याच्याशी आणि जान्हवी कपूरशी बोलणं बंद केलं होतं. यावर करणनेही आपली बाजू मांडली. तो म्हणाला की, या दोघांच्या वागण्यामुळे त्याला वाईट वाटलं होतं. करणच्या या वक्तव्यावर जान्हवीने मिश्किल प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “जेव्हा आमचं बोलणं बंद झालं होतं, तेव्हा माझं वजन वाढलं होतं.”

जान्हवीच्या या उत्तरानंतर वरुण धवननेही करणची चांगलीच फिरकी घेतली. तो म्हणाला, “ करण, तू खूप नाटकी गोष्टी बोलला होतास. तू तर ‘कभी खुशी कभी गम’मधील अमिताभ बच्चन बनला होतास. ते जसं म्हणतात ना, ‘मी मोठा आहे, माझा अधिकार आहे!.’ जान्हवी आणि वरुणच्या या मजेशीर संवादामुळे आगामी एपिसोडमध्ये भरपूर धमाल पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अर्जुन कपूरची अचानक एंट्री; जान्हवी आणि वरुण आश्चर्यचकित

या प्रोमोमधील आणखी एक खास आकर्षण म्हणजे अभिनेता अर्जुन कपूरची सरप्राइज एंट्री. अर्जुन अचानक शोमध्ये आल्याने जान्हवी कपूर आणि वरुण धवन दोघेही आश्चर्यचकित होतात. जान्हवी आणि अर्जुन यांच्यातील खास भावंडांचं नातं सर्वश्रुत आहे. त्यामुळे अर्जुनच्या या एंट्रीमुळे शोमध्ये आणखी रंगत येण्याची शक्यता आहे. आता या तिघांच्या उपस्थितीत करण जोहरच्या शोमध्ये कोणते नवे खुलासे आणि मजेशीर किस्से समोर येतात, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...