AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी त्यांना चांगला ओळखतो..; रणवीर सिंहच्या मदतीला धावून आला प्रसिद्ध गायक

'डॉन 3'च्या वादानंतर अभिनेता रणवीर सिंहविरोधात इंडस्ट्रीत असहकाराचे आदेश देण्यात आले आहेत. आता इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध गायक त्याच्या मदतीला धावून आला आहे. FWICE शी बोलून मध्यस्थी करणार असल्याचं त्याने म्हटलंय.

मी त्यांना चांगला ओळखतो..; रणवीर सिंहच्या मदतीला धावून आला प्रसिद्ध गायक
रणवीर सिंहImage Credit source: Instagram
| Updated on: May 28, 2026 | 11:00 AM
Share

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर अभिनेता रणवीर सिंह तुफान चर्चेत आहे. मात्र त्याचसोबत इंडस्ट्रीतील त्याचे वादही समोर येत आहेत. फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटातून शूटिंगच्या काही दिवस आधी अचानक माघार घेतल्यामुळे तो अडचणीत सापडला आहे. फरहान आणि एक्सेल एंटरटेन्मेंटने त्याच्याविरोधात ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’कडे (FWICE) तक्रार केली. त्यानंतर फेडरेशनने रणवीरविरोधात इंडस्ट्रीत असहकाराचे निर्देश जारी केले. म्हणजेच इंडस्ट्रीत कलाकारांना रणवीरसोबत काम न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयावर विविध कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच प्रसिद्ध गायक मिका सिंह रणवीरच्या मदतीला धावून आला आहे.

काय म्हणाला मिका सिंह?

‘वीरल भयानी’ या पापाराझी अकाऊंटशी बोलताना मिकाने रणवीरला समर्थन दिलं. तो म्हणाला, “रणवीर सिंह हा एक व्यक्ती म्हणून खूप चांगला आहे. तो अत्यंत विनम्र स्वभावाचा आहे. मी FWICE ला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. त्यामुळे मी वैयक्तिकरित्या त्यांची भेट घेऊन चर्चा करेन. अखेर आपण सर्वजण ‘भाऊ’ आहोत.”

नेमका वाद काय?

रणवीर सिंह ‘डॉन 3’मध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याची घोषणा 2023 मध्ये झाली होती. या फ्रँचाइजीच्या पहिल्या दोन भागांमध्ये अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मात्र शूटिंगच्या तीन आठवड्यांपूर्वी काही मतभेदांमुळे रणवीरने अचानक माघार घेतली. यामुळे दिग्दर्शक फरहान अख्तर आणि निर्मिती संस्थेला 45 कोटी रुपयांचा फटका बसला. याविरोधात त्यांनी FWICE कडे तक्रार दाखल केली. त्यानंतर FWICE ने रणवीरला त्याची बाजू मांडण्यासाठी दर दहा दिवसांनी एक असे तीन नोटीस पाठवले होते. मात्र रणवीरने त्यावर कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने अखेर त्याच्याविरोधात असहकाराचे आदेश देण्यात आले.

रणवीरची प्रतिक्रिया

रणवीरच्या प्रवक्त्याने या प्रकरणी म्हटलंय, ‘या चित्रपटसृष्टीचा आणि डॉन फ्रँचाइजीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचा रणवीर खूप आदर करतो. याप्रकरणी त्याने जाणूनबुजून मौन बाळगलं होतं, कारण त्याच्या मते व्यावसायिक संवाद आणि वैयक्तिक नात्यांना प्रतिष्ठा, परिपक्वता आणि एकमेकांच्या सन्मानानेच सांभाळलं पाहिजे. वेळोवेळी त्याच्याबद्दल विविध चर्चा झाल्या, अंदाज व्यक्त करण्यात आले, पण रणवीरने कधीच सार्वजनिकरित्या उत्तर देण्याला किंवा अंदाजांना अधिक हवा देणं गरजेचं मानलं नाही. त्याचं संपूर्ण लक्ष कामावर आणि आगामी प्रोजेक्ट्सवर आहे. डॉन चित्रपटाच्या फ्रँचाइजीशी संबंधित सर्व लोकांचा तो आदर करतो आणि डॉन 3 या चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा देतो. अशा काळात धैर्याने वागण्याचा आणि शांतीपूर्ण राहण्याचा त्याचा निर्णय असून यापुढेही तो हेच करणार आहे.’

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती