Pathaan: “कला की अश्लीलता..”, भगव्या बिकिनीवरील वादावरून मिलिंद सोमणला आठवलं त्याचं न्यूड फोटोशूट

| Updated on: Dec 19, 2022 | 12:15 PM

'बेशर्म रंग' गाण्यावरील वादावर मिलिंद सोमणची प्रतिक्रिया; स्वत:च्या न्यूड फोटोशूटचा केला उल्लेख

Pathaan: कला की अश्लीलता.., भगव्या बिकिनीवरील वादावरून मिलिंद सोमणला आठवलं त्याचं न्यूड फोटोशूट
'बेशर्म रंग' गाण्यावरील वादावर मिलिंद सोमणची प्रतिक्रिया
Image Credit source: Facebook
Follow us on

मुंबई: ‘पठाण’ या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या गाण्यातील एका दृश्यादरम्यान दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी घातली आणि याच बिकिनीच्या रंगावरून वाद सुरू झाला. भगव्या रंगाची बिकिनी घालून बोल्ड सीन देत दीपिकाने सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप काही हिंदू संघटनांनी केली. तर काहींनी गाण्यातील बोल्ड दृश्यांवरही आक्षेप घेतला आहे. यावर आता अभिनेता आणि फिटनेस फ्रीक मिलिंद सोमणने प्रतिक्रिया दिली आहे. बेशर्म रंग गाण्यावरील वाद पाहून मिलिंदला त्याच्या न्यूड फोटोशूटची आणि त्यावरून झालेल्या वादाची आठवण झाली.

1995 मध्ये मिलिंदने गर्लफ्रेंड आणि मॉडेल मधू सप्रे हिच्यासोबत न्यूड फोटोशूट केलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मिलिंद म्हणाला, “ही कला आणि अश्लीलचा याचा विचार कोर्ट करणार. हा मुद्दा सोडवला पाहिजे. कोणीच कधी पूर्णपणे समाधानी नसतो. माझ्या आयुष्यातील 14 वर्षे यात गेली.”

“अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायला पाहिजे आणि प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात. जर त्यांनी काही आक्षेपार्ह म्हटलं असेल तर त्यावर कायदा निर्णय घेईल”, असंही तो पुढे म्हणाला.

हे सुद्धा वाचा

बेशरम रंग हे गाणं विशाल-शेखर या जोडगोळीने संगीतबद्ध केलं असून कुमार यांनी त्याचे बोल लिहिले आहेत. या गाण्यात शाहरुख आणि दीपिका यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री पहायला मिळते. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

वादादरम्यान शाहरुखचं वक्तव्य

पठाणमधील गाण्याच्या या वादादरम्यान शाहरुखने कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये केलेलं वक्तव्य चर्चेत आलं. “हे जग आता नॉर्मल झालंय. सर्वजण खुश आहेत. मी सर्वाधिक खुश आहे आणि हे सांगण्यात मला कोणतीही समस्या नाही की जगाने काहीही केलं तरी, मी, तुम्ही लोकं आणि जगात जितकेही सकारात्मक लोक आहेत, ते जिवंत आहेत”, असं तो म्हणाला.