Marriage Life : माजी महिला खासदाराने गुपचुप बांधली लग्नगाठ, पण लपवला जोडीदाराचा चेहरा, ‘तो’ करतो काय?
Marriage Life : माजी महिला खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप लग्न उरकलं असून, लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पण तिने जोडीदाराचा चेहरा लपवला असून, तो काय करतो जाणून घ्या... सध्या सर्वत्र तिच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.

Marriage Life : आता लग्न सराईची सुरुवात झाली असून, अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान एका माजी महिला खासदार आणि अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अभिनेत्रीने गुपचूप लग्न उरकलं असून, जोडीदाराचा चेहरा देखील लपवला आहे. खुद्द अभिनेत्रीने खास दिवसाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या ज्या माजी महिला खासदार आणि अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आहे. अभिनेत्री 26 नोव्हेंबर रोजी नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. तर अभिनेत्रीचा नवरा कोण आणि काय करतो? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, मिमी हिने 26 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे सिद्धार्थ दत्त यांच्यासोबत लग्न केलं आहे. दोघांनी कोणत्या मोठ्या सोहळ्याचं आयोजन केलं नव्हतं, तर त्यांनी रडिस्ट्रर मॅरिज केलं आहे. मिमी आणि सिद्धार्थ यांनी कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्न केलं आहे. या आनंदाच्या क्षणांचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. पण तिने नवऱ्याचा चेहरा दाखवला नाही.
मिमी आणि सिद्धार्थ यांच लग्न एक खासदी सोहळा होत. अभिनेत्रीच्या घरातच लग्न संपन्न झालं आहे. या दरम्यान या जोडीने साखरपुड्याच्या अंगठ्यांची देवाणघेवाण केली आणि कायदेशीररीत्या आपल्या लग्नाची नोंदणी केली. लग्नाच्या दिवसासाठी दोघांनी पांढऱ्या आणि सोनेरी रंगाचे पारंपरिक पोशाख निवडले होते. रिपोर्टनुसार, सिद्धार्थ हे मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी आहेत.
मात्र, अभिनेत्रीने फोटोंमध्ये आपल्या जोडीदाराचा चेहरा पूर्णपणे दाखवलेला नाही. मिमीने कॅप्शनमध्ये फक्त हार्ट इमोजी टाकले आणि हा तिच्या आयुष्यातील एक संस्मरणीय दिवस ठरल्याचे सांगितलं. लग्नाची अधिकृत घोषणा होताच चाहते आणि सेलिब्रिटी मिमीला या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.
कामाबद्दल बोलायचे तर, मिमी झी5 बंगालीच्या ‘तांडव’ या ओरिजिनल वेब सिरीजच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. राज चक्रवर्ती यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत गौरव चक्रवर्ती देखील दिसणार आहेत. सध्या सर्वत्र मिमी चक्रवर्ती हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.