
मुंबई | 10 मार्च 2024 : मिस वर्ल्ड 2024 चा फिनाले यांदाच्या वर्षी भारतात आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये मिस वर्ल्ड 2024 चा फिनाले मोठ्या थाटात पार पडला आहे. चेक रिपब्लिकच्या क्रिस्टीना पिजकोव्हा हिने मिस वर्ल्डचा किताब स्वतःच्या नावावर केला आहे, तर लेबनॉनची यास्मिना जायतौन ही या स्पर्धेत पहिली उपविजेती ठरली. स्पर्धत सिनी शेट्टी हिने भारताचं प्रतिनिधित्व केलं. पण शेवटच्या क्षणी सिनी हिचं स्वप्न भंगलं.
सिनी शेट्टी टॉप 8 पर्यंत पोहोचली पण टॉप 4 मध्ये सिनी स्वतःचं स्थान पक्क करु शकली नाही. स्पर्धा संपल्यानंतरचा सिनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनी हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. व्हिडीओमध्ये सिनी रडताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सिनी रडताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आई समोर दिसताच सिनी हिच्या डोळ्यात पाणी येतं. एवढंच नाहीतर, सिनी इतर कुटुंबियांना देखील भेटताना दिसत आहे. सिनी हिला रडताना पाहून भारतीयांनी देखील दुःख होत आहे. सध्या भारतात सर्वत्र फक्त आणि फक्त सिनी शेट्टी हिची चर्चा रंगली आहे.
सिनीने मिस वर्ल्डचा किताब जिंकला नसला तरी तिने याआधीही अनेकवेळा तिच्या आई-वडिलांना अभिमान वाटवं असं काम केलं आहे. सिनी शेट्टीने मिस इंडिया 2022 मध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व केलं. तेव्हा सिनीने मिस इंडियाचा ताज जिंकला होता. मिस वर्ल्डच्या ग्रँड फिनालेमध्ये सिनी शेट्टीही टॉप 8 मध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरली.
सिनी शेट्टी मूळची कर्नाटकची असून ती भारतीय मॉडेल आहे. सिनी एका राजघराण्यातील मुलगी आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी सिनीने मिस इंडियाचा किताब पटकावला होता. सिनीच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर, चार्टर्ड अकाउंटंटचे शिक्षण घेत आहे. एवढंच नाहीतर, सिनी उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे. सिनी हिने ‘निंबुडा’ गाण्यावर डान्स देखील केला होता. सध्या सर्वत्र सिनीची चर्चा रंगली आहे.