
सुंदर डोळ्यांमुळे ऐश्वर्या सारखी दिसते असं म्हटल्या जाणाऱ्या महाकुंभतील मोनालिसाचे अनेक व्हिडीओ, फोटो आता वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. खरं तर रुद्राक्ष विकणाऱ्या मोनालिसाचे बॉलिवूडमध्ये जाण्यात स्वप्न आहे. तिला संधी मिळाली तर तिला चित्रपटातही गाण्याचीही इच्छा आहे.
मध्य प्रदेशातील इंदूरहून महाकुंभात रुद्राक्षाच्या माळा विकण्यासाठी आलेल्या मोनालिसाला बॉलिवूडमध्ये अभिनेत्री बनायचं आहे. पण खरं तर तिला ऐश्वर्या सारखं म्हटलं जात असलं तरी मात्र तिची आवडती अभिनेत्री वेगळीच आहे. मोनालिसाला आयुष्यात एकदा तरी तिला भेटायचं आहे. असंही मोनालिसाने म्हटलं आहे.
आवडती अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अन् आवडता अभिनेता सलमान खान
मोनालिसाची आवडती अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आहे आणि आवडता अभिनेता सलमान खान आहे. तिला त्या दोघांनाही एकदा तरी भेटायचं आहे. गर्दीमुळे अस्वस्थ होऊन महाकुंभ सोडलेली मोनालिसा आता महाकुंभात परतली आहे. यावेळी ती स्वतःचे YouTube चॅनल घेऊन आली आहे. परतल्यानंतर तिने TV9 भारतवर्षसोबत खास संवादही साधला.
संवाद साधताना मोनालिसाने आपल्या भावनाही व्यक्त केल्या. मोनालिसाला सोनाक्षी सिन्हा आवडत असून तिच्यासारखं काम करण्याची आणि तिला भेटण्याची इच्छा आहे.
तसेच तिला बॉलीवूडमध्येही अभिनय करायचा आहे आणि संधी मिळाल्यास तिला चित्रपटातही गाण्याची इच्छा आहे. तसेच तिला अभिनेता म्हणून सलमान खान आवडतो त्यामुळे मीडियाशी बोलत असताना कृपया एकदा सलमानला भेटून हे सांगा अशी विनंतीही तिने केली आहे.
महाकुंभात रातोरात स्टार
इंदूरहून महाकुंभात रुद्राक्षाच्या माळा विकण्यासाठी आलेल्या मोनालिसा भोसलेला तिच्या सुंदर डोळ्यांनी स्टार बनवलं. तिचे रील्स आणि व्हिडिओ व्हायरल झाले. एवढच नाही तर यानंतर तिचा एक मेकओव्हरचा व्हिडीओ आणि फोटोही समोर आले. तसेच तिचे फॉलोअर्सही तेवढेच दणक्यात वाढले आणि काहीच तासांत ती सोशल मीडियावरील चक्क सेलिब्रिटी झाली.
फोटो व्हायरल कसे झाले?
मोनालिसा जेव्हा महाकुंभात रुद्राक्षाच्या माळा विकत होती तेव्हा तिला पाहून अचानक तिथे काही लोकांनी तिला घेरलं आणि तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा हट्ट धरला. तसेच तिचे फोटो आणि व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाले.
मोनालिसा एका यूट्यूब चॅनेलसह परतली
आता मोनालिसा पुन्हा एकदा महाकुंभात परतली आहे. मात्र यावेळी तिने स्वतःचे यूट्यूब चॅनल आणले असून या चॅनलसाठी ती व्हिडिओ आणि रील्स बनवत आहे. यासाठी तिने आपला पूर्णपणे मोकओव्हरही केला आहे.
ब्युटी पार्लर टीमने तिचा मेकअप करून दिल्यानं तिला खूप आनंद झाला आहे. ओठांवर गडद लिपस्टिक आणि डोळ्यांवरही मेकअप यामुळे तिचे सौंदर्य आणखी वाढले आहे.
शिक्षण पूर्ण करणार
टीव्ही 9 शी बोलताना तिने सांगितले की, तिला खूप अभ्यास करायचा होता, पण परिस्थितीमुळे ते शक्य झालं नाही. पण पुन्हा एकदा ती शिक्षणाच्या दिशेने वळणार असल्याचंही म्हटलं जात आहे. एवढच नाही तर मोनालिसाच्या पालकांनीही सांगितले गेले आहे की, जर त्यांच्या मुलीला शिक्षण घ्यायचे असेल तर ते तिला शिकू द्यावं.