Gangubai Kathiawadi Review : भव्यदिव्य सेट, सुरेल गाण्यांचा नजराणा, आलिया भटचा गंगुबाई काठियावाडी प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा गंगुबाई काठियावाडी या चित्रपट आज प्रदर्शित झालाय. या सिनेमाविषयी जाणून घेऊयात...

Gangubai Kathiawadi Review : भव्यदिव्य सेट,  सुरेल गाण्यांचा नजराणा, आलिया भटचा गंगुबाई काठियावाडी प्रेक्षकांच्या भेटीला
गंगुबाई काठियावाडी- सिनेमा
| Edited By: | Updated on: Feb 25, 2022 | 12:24 PM

आयेशा सय्यद, मुंबई : गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) मोस्ट वेटेड मुव्ही… अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay leela Bhansali) यांचा गंगुबाई काठियावाडी या चित्रपट आज प्रदर्शित झालाय. या सिनेमाविषयी मागच्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा म्हटलं की बिग बजेट भव्यदिव्य सेट… तसाच हा एक सिनेमा आहे. आलिया भटने साकारलेली गंगुबाई काठियावाडीची भूमिका अनेकांना प्रभावित करतेय. सिनेमातील गाणी, डायलॉग सोशल मीडियावर हीट ठरत आहेत. आज सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल झालेत. हा सिनेमा कसा आहे? हा सिनेमा पाहावा का? पाहावा तर का पाहावा? अश्या अनेक प्रश्नांचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न…

सिनेमाची भव्यता

संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा म्हटलं की बिग बजेट भव्यदिव्य सेट… तसाच हा एक सिनेमा आहे. सिनेमात दाखवण्यात आलेला कामाठीपुरा भाग भव्य दाखवण्यात आला आहे. सिनेमात करीम लालाची दिमाखदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जर अश्या भव्य दिव्य सिनेमांचे चाहते असाल तर हा सिनेमा तुम्ही पहायलाच हवा.

आलिया भटचं काम

अभिनेत्री आलिया भटने गंगुबाई हे या सिनेमातील मुख्य पात्र साकारलं आहे. गंगुबाईची स्टाईल तुम्हाला खिळवून ठेवते. आलियाने ही भूमिका इतक्या उत्तमरित्या साकारली आहे की या सिनेमात कुठेही आलिया भट तुमच्या नजरेस पडत नाही तर तुम्हाला फक्त गंगुबाईच दिसते.सिनेमागृहातून बाहेर पडलं की प्रेक्षकांकडून तुमच्या कानावर फक्त आलियाच्या कामाचं कौतुकच पडतं.

स्टारकास्ट

गंगुबाई काठियावाडी या सिनेमा अनेक कलाकार या एकाच सिनेमात पहायला मिळतात. पहिलं नाव म्हणजे अर्थात आलिया भट जिने गंगुबाई हे पात्र साकारलं आहे. दुसरं नाव म्हणजे अजय देवगण. त्याने करीम लालाचं पात्र साकारलं आहे. याशिवाय हुमा कुरेशी, शंतनू माहेश्वरी, विजय राझ असे अनेक कलाकार या सिनेमात तुम्हाला एकत्र पडद्यावर पहायला मिळतात.

गाण्याची जादू

संजय लिला भन्साळी यांच्या सिनेमांची आणखी एक खासियत ती म्हणजे सिनेमातील गाणी. या सिनेमातही अशीच एकचढ एक गाणी तुम्हाला बघायला मिळतात. ढोलिडा, मेरी जान, जब सय्या यासारखी गाणी तुमच्या मनाचा ठाव घेतात.

गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा बघण्यासाठी बरीच कारणं तुमच्यासमोर आहेत. तुम्हाला भव्य दिव्य सिनेमा पाहायचा असेल, तुम्ही आलिया भटचे चाहते असा किंवा तुम्हाला जर अजय देवगण आवडतं असेल तर हा सिनेमा जरूर पहावा. तुम्ही जर हा सिनेमा बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरुर सांगा.

संबंधित बातम्या

Malaika Arora : “पॅन्ट घालायला विसरली का?”, मलायका अरोरा पुन्हा ट्रोल

करीनाने केलं होतं शाहिद कपूरला प्रपोज, पण ‘या’ कारणामुळे झालं ब्रेकअप, एक अधुरी प्रेमकहानी

दिव्या भारतीच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम; त्या रात्री नेमकं काय घडलं?