Brahmastra First Review: Ranbir-Alia स्टारर ‘ब्रह्मास्त्र’चा रिव्यू , पाहा कसा आहे सिनेमा

| Updated on: Sep 10, 2022 | 11:53 AM

ब्रह्मास्त्र चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे महत्वाच्या भूमिका आहेत. तसेच या चित्रपटात शाहरुख खान देखील दिसलायं. चित्रपटाचे प्रिव्ह्यू प्रेससाठी आणि चाहत्यांसाठी ठेवण्यात आले होते.

Brahmastra First Review: Ranbir-Alia स्टारर ब्रह्मास्त्रचा रिव्यू , पाहा कसा आहे सिनेमा
Follow us on

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट अखेर काल प्रेक्षकांच्या भेटीला आलायं. चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झालायं. हा चित्रपट 2021 मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता, मात्र कोरोनामुळे चित्रपटाला (Movie) प्रदर्शित होण्यासाठी 2022 उजाडले. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास कमाल दाखू न शकल्याने चिंता व्यक्त केली जातयं. ब्रह्मास्त्र चित्रपटाकडून समिक्षकांसोबत चाहत्यांना देखील मोठ्या अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपट या अपेक्षांमध्ये खरा उतरलायं. ब्रह्मास्त्र चित्रपटाचा पहिल्या रिव्ह्यू नुकतेच पुढे आलायं.

आलिया रणबीरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचा पहिला रिव्यू पुढे…

ब्रह्मास्त्र चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे महत्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच या चित्रपटात शाहरुख खान देखील दिसलायं. चित्रपटाचे प्रिव्ह्यू प्रेससाठी आणि चाहत्यांसाठी ठेवण्यात आले होते. आता त्याचे रिव्ह्यू पुढे आले असून आनंदाची बाब म्हणजे ब्रह्मास्त्र चित्रपटाला अत्यंत चांगले रिव्ह्यू आले आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्‍ट्रीय पब्लिकेशन व्हरायटीने ब्रह्मास्त्र चित्रपटाला सुपरहिरो शानदार असे म्हटले आहे. आता ब्रह्मास्त्र चित्रपट बाॅक्स आॅफिसवर कोणते नवे रेकाॅर्ड तयार करतो हे बघण्यासारखे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

रणबीर- आलियाने ऑनस्क्रीन दाखवला करिश्मा

व्हरायटीने दिलेल्या रिव्यूनुसार, चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दोघांनीही जबरदस्त अभिनय केला असून त्यांच्या भूमिकेमुळे प्रेक्षक स्क्रीनसोबत कनेक्ट राहतो. या चित्रपटात रणबीर कपूरचा ऑनस्क्रीन करिश्मा दिसून आलायं. चित्रपटात आलियाची भूमिका उत्साह आणणारी आहे. नागार्जुन आणि बिग बीच्या भूमिकेमुळे चित्रपटाला चार चांद लागल्याचे समिक्षकांकडून सांगण्यात आले. मात्र, यावेळी समिक्षकांनी शाहरुख खानच्या भूमिकेबद्दल कुठलेही मत मांडले नाहीयं.