Nana Patekar : जुना वाद, नवी ठिणगी, तनुश्री दत्ताच्या नव्या दाव्याने खळबळ, 18 वर्षांनंतर नाना पाटेकरांचे जुने उत्तर चर्चेत
Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता ही जे वक्तव्य करत आहे, त्यामुळे नानांच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काही वर्षांपूर्वी तनुश्री हिने नानांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केलेले. ज्यावर स्वतः नाना पाटेकर यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. आता 18 वर्षांनंतर त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

Nana Patekar : बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता सतत वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे. ज्यामुळे तिला टीकेचा देखील सामना करावा लागत आहे. नानांच्या निधनानंतर तनुश्री हिने ‘ईव्हेल डेड’ असा शब्द वापरला. ज्यामुळे जुन्या वादाला नवी ठिणगी लागली आहे. महत्त्वाचं म्हणजे तनुश्री येथेच थांबली नाही, तर तिने त्यानंतर देखील काही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत नानांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तिचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तनुश्री दत्ता हिच्यासोबत काय झालं होतं?
तनुश्री दत्ता हिने लावलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे फक्त तिलाच माहिती आहे. रिपोर्टनुसार, ‘हॉर्न ओके प्लीज’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान नाना पाटेकर यांनी वाईट स्पर्श केल्याचे आरोप तनुश्री हिने केले होते. यावर नानांनी देखील त्यांची बाजू मांडत स्पष्टीकरण दिलं होतं आणि अभिनेत्रीने केलेले सर्व आरोप फेटाळले होते.. आता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.
आरोपांवर काय म्हणालेले नाना पाटेकर?
सांगायचं झालं तर, 2008 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ सिनेमातून तनुश्री हिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ज्यावर नाना पाटेकर म्हणालेले, ‘याबद्दल मला काहीही माहिती नव्हतं. मी सिनेमाची शुटिंग करत होतो आणि अचानक मला याबद्दल कळलं…’ नाना यांना माहिती नव्हतं की, तनुश्री हिला सिनेमातून का काढलं. तनुश्री हिने केलेल्या आरोपांवर नाना पाटेकर म्हणाले, ‘माझं काम स्टेजवर परफॉर्म करणं होतं… त्या ठिकाणी मी काय गैरवर्तन केलं आहे. याबद्दल मला काहीच आयडीया नाही..’
पुढे नाना पाटेकर म्हणाले, ‘सेटवर 100 लोक उपस्थित होते. त्यांच्यासमोर हे सर्व होत होतं. मला प्रचंड वाईट वाटत आहे कारण अशा आरोपांवर मला स्पष्टीकरण द्यावं लागत आहे. गेल्या 35 वर्षांपासून मी इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. कधीच कोणी माझ्यावर असे आरोप केले नाहीत. ही मुलगी असं का बोलत आहे, मला कळत नाही…’ नाना पाटेकर पुढे असं देखील म्हणालेले, ‘माध्यमांसमोर मला याबद्दल बोलायचं नाह . तरीही, त्याच्या सिनेमाचे दिग्दर्शक आणि कोरियोग्राफर यांच्यासह अनेक लोकांनी त्याला यावर भाष्य करण्याची विनंती केली; त्यानंतर तो या प्रकरणावर बोलण्यासाठी नाना पाटेकर पुढे आले.
तनुश्रीने केलेल्या आरोपांमुळे दुःखी होते नाना पाटेकर
माध्यमांशी बोलताना नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ता यांनी केलेल्या आरोपांवर आपली प्रतिक्रिया दिली आणि या आरोपांमुळे आपल्याला खूप वेदना झाल्याचं सांगितलं होतं. इतक्या वर्षांत आपल्यावर पहिल्यांदाच असा आरोप झाल्याचे ऐकून अत्यंत वाईट वाटल्याचे त्यांनी व्यक्त केले. जेव्हा माध्यमांनी त्यांना विचारलं की ते भविष्यात कधी तनुश्रीसोबत काम करतील का, तेव्हा त्यांनी त्यावर काहीही भाष्य केलं नाही. या घटनेबाबत नानांनी त्या अभिनेत्रीला सल्लाही दिला; कोणावरही असे गंभीर आरोप करणं योग्य नाही, असे ते म्हणाले होते.