त्याचं डोकं ठिकाणावर नसतं, शिवीगाळ करतो; नाना पाटेकरांविषयी हे काय बोलून गेला अभिनेता

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नाना पाटकेर यांच्याविषयी एका अभिनेत्याने किस्सा सांगितला आहे. आता तो नेमकं काय म्हणाला चला जाणून घेऊया...

त्याचं डोकं ठिकाणावर नसतं, शिवीगाळ करतो; नाना पाटेकरांविषयी हे काय बोलून गेला अभिनेता
nana Patekar
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 03, 2025 | 1:43 PM

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर लवकरच अक्षय कुमारसोबत ‘हाउसफुल 5’ या चित्रपटात दिसणार आहेत. अक्षयसोबत ‘वेलकम’सारख्या चित्रपटात हास्याचा ओव्हरडोस दिल्यानंतर ते पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. नाना पाटेकर नेहमीच त्यांच्या गंभीर भूमिकांसाठी विशेष ओळखले जातात. पण त्यांच्या खऱ्या आयुष्याशी निगडीत काही रंजक किस्सेही आहेत. आता एका अभिनेत्याने सांगितलेला किस्सा सध्या चर्चेत आहे. तो नेमकं काय म्हणाला चला जाणून घेऊया…

नुकताच अभिनेते परेश रावल यांनी एका मुलाखतीत नानांविषयी मोठा खुलासा केला. ते म्हणाले की, नाना यांनी एकदा एका निर्मात्याला आपल्या घरी जेवायला बोलावले आणि नंतर त्याच्याकडून भांडी धुवून घेतली. याशिवाय, ज्येष्ठ आणि दिवंगत अभिनेते राजकुमार यांनी नाना यांच्याबद्दल सांगितले होते की, ते सेटवर शिवीगाळ करतात आणि त्यांचे डोके कायम खराब असते.

वाचा: सोबत झोपण्यास …; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने दिग्दर्शकासोबतचा सांगितला वाईट अनुभव

नाना यांना राजकुमार यांच्यासोबत काम करायचे नव्हते

नाना पाटेकर आणि राजकुमार यांनी ‘तिरंगा’ या सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केले होते. राजकुमार यांनी ब्रिगेडियर सूर्यदेव सिंह यांची भूमिका साकारली होती, तर इन्स्पेक्टर शिवाजी राव वागळे यांची भूमिका नाना यांनी निभावली होती. पण त्यांनी ही भूमिका सहजासहजी स्वीकारली नव्हती. ‘तिरंगा’चे दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, इन्स्पेक्टर वागळे यांच्या भूमिकेसाठी प्रथम नसीरुद्दीन शाह यांच्याशी संपर्क साधला गेला होता. पण राजकुमार यांच्या रुबाबदार आणि कठोर स्वभावामुळे त्यांनी ही भूमिका नाकारली.

मेहुल यांनी रजनीकांत यांच्याकडेही हा प्रस्ताव नेला होता. पण रजनीकांत यांनीही राजकुमार यांच्यामुळे चित्रपटात काम करण्यास नकार दिला. त्यानंतर मेहुल नाना यांच्याकडे गेले, पण नाना देखील या चित्रपटात काम करण्यास तयार नव्हते. तरीही मेहुल यांनी त्यांना कसेबसे मनवले. त्यानंतर मेहुल यांनी राज साहेब यांना फोन करून ही माहिती दिली.

‘नाना शिवीगाळ करतो’ राजकुमार म्हणाले

मेहुल यांनी मुलाखतीत सांगितले, “नाना यांनी चित्रपटासाठी होकार दिल्यानंतर मी राज साहब यांना फोन केला आणि सांगितले की वागळे फायनल झाला आहे. त्यांनी विचारले, ‘कोण करतोय?’ मी सांगितले, ‘नाना पाटेकर.’ त्यावर ते म्हणाले, ‘अरे मेहुल! त्याचे डोकं नेहमीच ठिकाणावर नसते, ऐकले आहे की तो सेटवर शिवीगाळ करतो.’ मेहुल पुढे म्हणाले, “मी सांगितले- राज साहब, मी सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. फक्त नाना यांनी एवढेच सांगितले की, जर राज साहेब सेटवर हस्तक्षेप करतील, तर मी सेट सोडून जाईन. त्यावर राज साहेब फक्त एकच शब्द बोलले- ‘मेहुल! गो अहेड.’”