सोबत झोपण्यास तयार…; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने दिग्दर्शकासोबतचा सांगितला वाईट अनुभव
या अभिनेत्रीने एकेकाळी टीव्ही विश्व गाजवले होते. पण आज ही अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये फारशी सक्रिय दिसत नाही.

बॉलिवूडपासून साउथ फिल्म इंडस्ट्रीपर्यंत कास्टिंग काउचचा सुळसुळाट आहे. याचा खुलासा वेळोवेळी अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी केला आहे. नुकतेच एका टीव्ही अभिनेत्रीनेही चित्रपटासाठी तिच्यासोबत झालेल्या घृणास्पद मागणीचा खुलासा केला. या अभिनेत्रीने सांगितले की, तिला जबरदस्तीने साउथ चित्रपटाची ऑफर देण्यात आली आणि तिच्यासमोर घाणेरड्या अटी ठेवण्यात आल्या.
या अभिनेत्रीचे नाव आहे सनाया इराणी. ती टीव्ही विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘इस प्यार को क्या नाम दूं’ आणि ‘मिले जब हम तुम’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या सनायाने तिचा कास्टिंग काउचचा अनुभव सांगितला. हॉटफ्लायला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत सनायाने सांगितले की, तिला साउथ फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवूड या दोन्ही ठिकाणी कास्टिंग काउचचा सामना करावा लागला.
वाचा: बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचा झाला साखरपुडा? कोण आहे ती मुलगी? जाणून घ्या सत्य
‘त्या व्यक्तीसोबत झोपण्यास तयार आहात का?’
सनाया इराणी तिचा कास्टिंग काऊचचा अनुभव सांगत म्हणाली, “साउथमधील एक व्यक्ती माझ्याशी चित्रपटासाठी भेटायला इच्छुक होती. मला चित्रपट करायचे नव्हते, पण तो आग्रह करत होता. भेटीनंतर त्याने सांगितले की, आम्हाला पूर्ण व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीची गरज आहे. मी त्याला विचारले की, मी पूर्ण व्यक्तीमहत्व असलेली मुलगी नाही का?” अभिनेत्री पुढे म्हणाली, “बर्याचदा असे वाटते की लोक अभिनेत्रींना फक्त यासाठी भेटतात की त्या त्यांच्यासोबत झोपण्यास तयार आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी.”
बॉलिवूडमध्येही सनायाला सामोरे जावे लागले कास्टिंग काउच
सनाया इराणीने पुढे सांगितले की, बॉलिवूडमधील एका दिग्दर्शकानेही तिच्याकडे विचित्र मागणी केली होती. ती म्हणाली, “जेव्हा मी त्यांना फोन केला, तेव्हा त्यांनी मला अर्ध्या तासात परत कॉल करण्यास सांगितले. मी 45 मिनिटांनंतर फोन केला, कारण मला वाटले की हे योग्य आहे. त्यांनी वारंवार माझ्याकडून वेळ विचारली. मला त्यांचा चुकीचा विचार समजू लागला आणि मला जाणवले की ते मला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “त्यांनी सांगितले की मी अनेक मोठ्या नायकांसोबत एक मोठा चित्रपट बनवत आहे आणि तुम्हाला बिकिनी घालावी लागेल. जेव्हा मी माझ्या भूमिकेबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी चुकीच्या पद्धतीने जोर देऊन विचारले की मी बिकिनी घालण्यास तयार आहे की नाही? मी फोन कट केला.”
