
धकधक गर्ल माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या सौंदऱ्यापासून ते तिच्या डान्सपर्यंत सर्वजण तिचे चाहते आहेत. फक्त सामान्यच नाहीत तर बॉलिवूडमधील कलाकार देखील तिचे चाहते आहेत. त्यापैकी एक म्हणजे नाना पाटेकर, होय नाना पाटेकरांनाही माधुरी अभिनेत्री म्हणून फार आवडते. तेही तिचे चाहते आहेत. नाना पाटेकर आणि माधुरीने एकत्र कामही केलं आहे.
नाना पाटेकरांनी माधुरीसाठी एक कविता लिहिली होती
एवढंच नाही तर एका टीव्ही शोमध्ये येताना नाना पाटेकर यांनी माधुरी त्यांना किती आवडते याचा देखील त्यांनी खुलासा केला होता. त्यावेळी त्यांनी चक्क माधुरीसाठी एक कविताही ही लिहिली होती. एका शोमध्ये त्यांनी ती बोलूनही दाखवली होती. त्यांनी ती कविता मोठ्याने वाचली. या शोमधील व्हिडिओचा एक भाग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते त्यांच्या प्रेमाचे वर्णन करताना दिसत आहे.
‘माधुरी दीक्षित एकतर्फी आवडते….’
या व्हायरल व्हिडिओमध्ये नाना पाटेकर एका कवितेद्वारे माधुरी दीक्षितवरील प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. ते कविता सादर करण्याच्यावेळी म्हणाले होते की, “मला माधुरी दीक्षित एकतर्फी आवडते, अर्थातच ते तिच्याकडून असू शकत नाही. पण त्यावेळी मी एकदा माधुरीसाठी कविता लिहिली होती, पण मी ती तेव्हा वाचू शकलो नाही. पण आज मी ती म्हणू शकतो.” त्यानंतर त्यांनी ती सुंदर किविता वाचून दाखवली होती.
नाना पाटेकर यांनी माधुरीसाठी लिहिलेली कविता
कैसे बताऊं मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो,
कैसे बताऊं मैं तुम्हें, तुम धड़कनों का गीत हो
जीवन का संगीत हो,
तुम जिंदगी,
तुम मंदगी,
तुम रोशनी,
तुम ताजगी,
तुम हर खुशी,
प्यार हो,
प्रीत हो,
मनमीत हो,
आंखों में तुम,
यादों में तुम,
नींदों में तुम,
ख्वाबों में तुम हो,
तुम हो मेरी हर बात में,
तुम हो मेरे दिन रात में,
तुम सुबह में,
तुम शाम में,
तुम सोच में,
तुम काम में,
मेरे लिए पाना भी तुम,
मेरे लिए खोना भी तुम,
मेरे लिए हंसना भी तुम,
मेरे लिए रोना भी तुम,
और जागना- सोना भी तुम,
जाऊं कहीं, देखूं कहीं,
तुम हो वहां,
तुम हो वहीं,
कैसे बताऊं मैं तुम्हें,
तुम बिन तो मैं कुछ भी नहीं.
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या
नाना पाटेकर यांच्या या कवितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. नेटकऱ्यांनाही तो व्हिडिओ फार आवडला. तसेच या व्हिडीओमध्ये एका युजरने लिहिले की, ‘ही कविता ऐकल्यानंतर माधुरी दीक्षित तुमच्या प्रेमात पडेल’, दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘नाना पाटेकर इतके रोमँटिक आहेत हे आम्हाला माहित नव्हते’, सर्व नेटकऱ्यांनी नानांच्या या रोमँटीक अंदाजाचे कौतुक केले आहे.