‘खूप लवकर सोडून गेलात..’; ज्युनियर NTR च्या चुलत भावाच्या निधनाने साऊथ फिल्म इंडस्ट्री हळहळली

| Updated on: Feb 19, 2023 | 9:18 AM

गेल्या महिन्यात ते आंध्रप्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात टीडीपी महासचिव नारा लोकेश यांच्या युवागलम पदयात्रेत सहभागी झाले होते. या पदयात्रेत ते अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

खूप लवकर सोडून गेलात..; ज्युनियर NTR च्या चुलत भावाच्या निधनाने साऊथ फिल्म इंडस्ट्री हळहळली
वयाच्या 39 व्या वर्षी नंदमुरी तारका रत्न यांनी घेतला अखेरचा श्वास
Image Credit source: Instagram
Follow us on

बेंगळुरू: साऊथ स्टार आणि ज्युनियर एनटीआरचे चुलत भाऊ नंदमुरी तारका रत्न यांचं शनिवारी निधन झालं. काही दिवसांपूर्वी त्यांना पदयात्रेदरम्यान कार्डिॲक अरेस्ट आला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर ते कोमात असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. अखेर शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 39 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या महिन्यात ते आंध्रप्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात टीडीपी महासचिव नारा लोकेश यांच्या युवागलम पदयात्रेत सहभागी झाले होते. या पदयात्रेत ते अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

तारका रत्न यांच्यावर बेंगळुरूमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. ते कोमात गेल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं होतं. तारका रत्न हे अभिनेता ज्युनियर एनटीआरचे चुलत भाऊ आहेत. ज्युनियर एनटीआरने रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ते भावूक झाले होते. तारका रत्न यांच्या निधनाने आता संपूर्ण दाक्षिणात्य सिनेसृष्टी हळहळली आहे.

हे सुद्धा वाचा

‘तारका रत्न यांच्या अकाली निधनाने मोठा धक्का बसला. खूप लवकर निघून गेलास बाऊ.. या कठीण काळात माझ्या सहवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे’, अशा शब्दांत अभिनेता महेश बाबूने शोक व्यक्त केला. अल्लू अर्जुननेही ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘तारका रत्न यांच्या निधनाची बातमी ऐकून माझं मन हेलावलं. खूपच लवकर निघून गेले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो’, असं ट्विट त्याने केलं आहे.

‘अत्यंत जिद्दीने मृत्यूशी झुंज देणाऱ्या तारका रत्न यांच्या निधनाची बातमी समजल्यावर खूप दु:ख झालं. ते त्यांच्या दयाळू स्वभावासाठी कायम लक्षात राहतील’, अशा शब्दांत अभिनेता रवी तेजा याने भावना व्यक्त केल्या. चित्रपटसृष्टीतील कलाकारांसोबत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनीसुद्धा शोक व्यक्त केला.