ही दुसरी जया बच्चन..; रणबीर कपूरच्या सासूचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर जूनमध्ये आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2022 रोजी तिने मुलगी राहा कपूरला जन्म दिला.

ही दुसरी जया बच्चन..; रणबीर कपूरच्या सासूचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
Raha Kapoor and Soni Rajdan
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 10, 2024 | 5:13 PM

जया बच्चन म्हटलं की तापट स्वभाव हे विशेषण आपोआप प्रेक्षकांच्या डोक्यात येतं. फोटोग्राफर्स, पापाराझी, माध्यम प्रतिनिधी यांच्यासमोर अनेकदा त्यांना चिडलेलं पाहिलं गेलंय. कॅमेरासमोर जया बच्चन यांनी अनेकदा लोकांना सुनावलंय. आता अभिनेत्री आलिया भट्टची आई आणि रणबीर कपूरच्या सासू सोनी राजदान यांना पाहून नेटकऱ्यांना पुन्हा एकदा जया बच्चन यांचीच आठवण झाली. सोनी राजदान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नात राहा कपूरला गाडीतून फिरवतानाचा त्यांचा हा व्हिडीओ आहे. मात्र अचानक असं काही घडतं, ज्यामुळे त्या रागात राहाला त्यांच्या मागे लपवतात.

आलिया आणि रणबीरची मुलगी राहा कपूरला घेऊन सोनी राजदान या मुंबईत गाडीने फिरत होत्या. एका ठिकाणी त्यांची कार थांबली होती. तेव्हा राहा कारच्या खिडकीतून बाहेर डोकावून कुतूहलाने इकडे-तिकडे बघत असते. इतक्यात पापाराझी तिला पाहतात आणि हाक मारत व्हिडीओ शूट करत असतात. हे पाहताच सोनी राजदान पटकन राहाला खाली बसवतात आणि पाठ फिरवून बसतात. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट पहायला मिळतो. आजीने खाली बसवल्यानंतरही राहा खिडकीबाहेर कुतूहलाने बघतच असते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘राहाची आजी पापाराझींसोबत नीट वागत नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘आता ती लहान मुलगी मोकळ्या हवेत श्वाससुद्धा घेऊ शकत नाही का’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. सोनी राजदान यांचा राग पाहून एका युजरने लिहिलं, ‘ही तर दुसरी जया बच्चन.’ आणखी एकाने म्हटलंय ‘बिचाऱ्या राहाला कारच्या खिडकीतून बाहेर बघण्याचीही परवानगी नाही.’

रणबीर कपूर आणि आलिया भट्टने एप्रिल 2022 मध्ये लग्न केलं होतं. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात आलियाने राहाला जन्म दिला. रणबीर आणि आलियाने सुरुवातीला राहाचे कोणतेच फोटो क्लिक न करण्याची विनंती पापाराझींना केली होती. नंतर त्यांनी स्वत:हून राहाला पापाराझींसमोर आणलं. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पहायला मिळतात. मुलीचा चेहरा सर्वांसमोर न आणण्याविषयी आलिया एका मुलाखतीत म्हणाली होती, “माझ्या मुलीबद्दल कोणतीच गोष्ट बोलण्यासाठी मी सध्या कम्फर्टेबल नाही. अनेकांकडून मला शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत आहेत. मला राहाची आई अशी हाक मारली जात आहे, जे मला खूपच क्युट वाटतं. पण ज्यांच्यावर मी प्रेम करते, त्यांच्याबाबत मी फार प्रोटेक्टिव्ह आहे. मला खरंच असं वाटतं की बाळाने पब्लिक पर्सनॅलिटी व्हायची काही गरज नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे.”