ऐश्वर्यासारखी हुबेहूब दिसते या बॉलिवूड अभिनेत्याची मुलगी, सौंदर्य पाहून तुम्ही देखील म्हणाल…

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी दिसते हुबेहूब ऐश्वर्या राय सारखी. नवीन लुकने तर सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ. व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल.

ऐश्वर्यासारखी हुबेहूब दिसते या बॉलिवूड अभिनेत्याची मुलगी, सौंदर्य पाहून तुम्ही देखील म्हणाल...
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 14, 2026 | 6:58 PM

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची मुलगी शोरा सिद्दीकी सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्यामध्ये ती वडिलांसोबत दिसत आहे. या व्हिडिओत तिचं व्यक्तिमत्त्व आणि सौंदर्य पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेक जण तिच्या बॉलिवूड पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

माध्यमांमधील चर्चेनुसार, शोरा सिद्दीकी लवकरच गायक अरिजीत सिंह यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणाच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करू शकते. जरी याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी या बातमीमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

कुटुंब आणि शिक्षण

नवाजुद्दीन सिद्दीकीने 2009 साली आलिया सिद्दीकी यांच्याशी विवाह केला. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. एक शोरा आणि मुलगा यानी. डिसेंबर 2025 मध्ये शोरा 17 वर्षांची झाली आहे. ती अनेकदा मुंबईतील फिल्म इव्हेंट्समध्ये वडिलांसोबत दिसते. सध्या ती लंडनमध्ये अभिनयाचे शिक्षण घेत आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नवाजुद्दीनने मुलीचा ऑडिशन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये शोरा इंग्रजी संवाद आत्मविश्वासाने सादर करताना दिसली. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या पोस्टसोबत नवाजुद्दीनने कॅप्शनमध्ये “Can I come in… Scene One” असे लिहिले होते. तिचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिच्या आत्मविश्वासाचं आणि नैसर्गिक अभिनयाचं भरभरून कौतुक केलं.

नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी शोरा “खूप कॉन्फिडंट” आणि “नॅचरल अ‍ॅक्टर” असल्याचं म्हटलं. काहींनी तर तिची तुलना ऐश्वर्या राय बच्चनशी करत तिच्या सौंदर्याचंही कौतुक केलं.

शोरा सिद्दीकीने लंडनमधील वेस्ट एंड स्टेज, थिएटर समर स्कूलमध्ये ‘ब्यूटी अँड द बीस्ट’ या म्युझिकलमध्ये अभिनय केला आहे. त्यामुळे तिला लहान वयातच आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनयाचा अनुभव मिळाला आहे. स्वतः नवाजुद्दीन सिद्दीकीने दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतले असून, आपल्या मुलीला अशा प्रतिष्ठित संस्थेत प्रशिक्षण मिळत असल्याचा त्याला अभिमान आहे.


दरम्यान, शोरा सिद्दीकीचा आत्मविश्वास, तिची मेहनत आणि अभिनयावरील गंभीरता पाहता ती भविष्यात एक दमदार अभिनेत्री म्हणून समोर येऊ शकते. तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या अभिनयाचाही प्रेक्षकांना लवकरच अनुभव घेता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Follow Us