Nyanthara | नयनतारा एटलीवर नाराज? अखेर अभिनेत्रीने सोडले माैन, ‘तो’ वाद वाढणार?

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या या चित्रपटाने ओपनिंग डेलाच मोठी कमाई केली. शाहरुख खान याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळाली.

Nyanthara | नयनतारा एटलीवर नाराज? अखेर अभिनेत्रीने सोडले माैन, तो वाद वाढणार?
| Updated on: Sep 22, 2023 | 3:24 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा जवान हा चित्रपट ब्लॉकबस्टर चित्रपट ठरलाय. शाहरुख खान याच्या चित्रपटाने मोठा धमाका केलाय. शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाने भारतामध्ये 526 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केल्याचे सांगितले जातंय. विशेष म्हणजे जवान चित्रपटाची हवा फक्त भारतामध्येच नाही तर विदेशातही बघायला मिळाली. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने चाहत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय.

शाहरुख खान याने जवान चित्रपटाचे प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार पद्धतीने नक्कीच केले. शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये त्याच्या जवान चित्रपटाबद्दल एक मोठी क्रेझ दिसली. शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात दिसला. शाहरुख खान हा चाहत्यांच्या प्रश्नांना धमाकेदार पद्धतीने उत्तरे देताना दिसला.

शाहरुख खान याचा आता जवान चित्रपटानंतर लगेचच डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. शाहरुख खान याच्यासाठी हे वर्षे नक्कीच खास ठरले. यंदा चार वर्षांनंतर त्याने बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये पुनरागमन केले हे अत्यंत विशेष आहे. इतकेच नाही तर शाहरुख खान याचा मुलगा आणि मुलगीही यंदाच बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहेत.

शाहरुख खान याच्या जवान चित्रपटामध्ये साऊथ स्टार नयनतारा ही मुख्य भूमिकेत आहे. मात्र, नयनतारा ही जवान चित्रपटाचे निर्देशक एटली यांच्यावर नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. चित्रपटामध्ये नयनतारा मुख्य भूमिकेत असूनही तिच्या भूमिकेपेक्षा दीपिका पादुकोण हिच्या कॅमिओला महत्व दिल्याने नयनतारा नाराज असल्याची जोरदार काही दिवस रंगली.

इतकेच नाही तर दीपिका पादुकोण हिच्या कॅमिओसाठी नयनतारा हिचे बरेच सीन्स कट करण्यात आल्याचा आरोप सतत केला जातोय. नयनतारा हिच्या चाहत्यांनी तर थेट कायदेशीरपणे लढण्याचा तिला सल्ला देखील दिला. इतकेच नाही तर यामुळे नयनतारा हिच्या चाहत्यांमध्येही संताप बघायला मिळाला. यावर काही दिवस नयनतारा हिने माैन बाळगले.

आता शेवटी यावर उत्तर देताना नयनतारा ही दिसलीये. नयनतारा हिने निर्देशक एटली यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. या पोस्टमुळे आता सर्व चर्चा बंद होणार हे स्पष्ट आहे. नयनतारा हिने सोशल मीडियावर जवान चित्रपटाच्या सेटवरील खास फोटो शेअर केला. या फोटोमध्ये एटली हा दिसतोय. ही पोस्ट शेअर करत नयनतारा हिने लिहिले की, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, एटली तुझा खूप अभिमान आहे…