अमोल कोल्हे यांच्या नथुरामला आमचा विरोध नाही, राष्ट्रवादीची सर्वात मोठी भूमिका

| Updated on: Jan 21, 2022 | 12:38 PM

आयेशा सय्यद, मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (dr. amol kolhe )  यांनी साकारलेल्या नथुराम गोडसे (nathuram godadse) या भूमिकेवरून सध्या राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झालाय. अशात आता राष्ट्रवादी पक्षाची (ncp) अधिकृत भूमिका आता समोर आली आहे. ‘राष्ट्रवादी हा संविधानाचा सन्मान करणारा पक्ष आहे. या संविधानाने दिलेले अधिकार प्रत्येकाला आहेत आणि कर्तव्यही […]

अमोल कोल्हे यांच्या नथुरामला आमचा विरोध नाही, राष्ट्रवादीची सर्वात मोठी भूमिका
अमोल कोल्हे, शरद पवार
Follow us on

आयेशा सय्यद, मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (dr. amol kolhe )  यांनी साकारलेल्या नथुराम गोडसे (nathuram godadse) या भूमिकेवरून सध्या राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झालाय. अशात आता राष्ट्रवादी पक्षाची (ncp) अधिकृत भूमिका आता समोर आली आहे. ‘राष्ट्रवादी हा संविधानाचा सन्मान करणारा पक्ष आहे. या संविधानाने दिलेले अधिकार प्रत्येकाला आहेत आणि कर्तव्यही प्रत्येकासाठीच आहेत. त्यानुसार अमोल कोल्हे कलाकार म्हणून नथुराम गोडसेची भूमिका साकारत असतील तर त्याला आमचा विरोध नाही’ असं राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील (babasaheb patil) यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

राष्ट्रवादीची भूमिका काय आहे?

‘अमोल कोल्हे यांची कलेशी बांधिलकी आहे. त्यानुसार ते ही भूमिका साकारत आहेत. परंतु त्यांची वैचारिक बांधिलकी ही राष्ट्रवादी पक्षाच्या वैचारिक भूमिकेशीच आहे, याबाबत आमच्या मनात कोणताही संदेह नाही. शरद पोंक्षे नथुराम गोडसेची भूमिका त्या विचारांच्या प्रचारासाठी साकारतात तर अमोल कोल्हे कलाकार म्हणून कलेशी असलेल्या बांधिलकीतून ही भूमिका साकारताहेत, हा त्यातील मुलभूत फरक आहे. त्यामुळे त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारण्याला आमचा विरोध नाही’, असं बाबासाहेब पाटील म्हणालेत.

आव्हाडांचा विरोध

अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेंची भूमिका करण्याला राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. अमोल कोल्हे यांनी जरी कलाकार म्हणून ही भूमिका साकारली असली तरी त्यात गोडसेचं समर्थन आलंच. आणि मी गोडसेंच्या कृतीचं, गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही. माझा अमोल कोल्हेंच्या गोडसेची भूमिका साकारण्याला विरोध आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

30 जानेवारी 1948 या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसेने हत्या केली होती. याच दिवसाचा धागा पकडत येत्या 30 तारखेलाच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे, यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

अमोल कोल्हे यांचं स्पष्टीकरण

‘कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातच आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो आणि त्या साकारताना समाधानही मिळतं परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे. मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा! याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावं ही अपेक्षा!’, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या

‘हां मैने गांधी का वध किया’, नेहमी छत्रपतींची भूमिका साकारणाऱ्या कोल्हेंच्या ‘नथूराम गोडसे’त नेमकं काय आहे?

‘हा महाराष्ट्र तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही’, नथूराम गोडसेची भूमिका का केली? खासदार कोल्हेंनी सविस्तर सांगितल