Neena Gupta | ‘तुम्हाला कोणीही शारीरिक संबंधांसाठी…’, इंडस्ट्रीबद्दल यावेळी नीना गुप्ता थेटच म्हणाल्या

Neena Gupta | झगमगत्या विश्वात लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी तडजोड करावीच लागते! कास्टिंग काऊचबद्दल नीना गुप्ता यांचं स्पष्ट वक्तव्य... सध्या सर्वत्र नीना गुप्ता यांच्या वक्तव्याची चर्चा... इंडस्ट्रीच्या दुसऱ्या बाजूबद्दल नीना गुप्ता याचं स्पष्ट वक्तव्य

Neena Gupta | तुम्हाला कोणीही शारीरिक संबंधांसाठी..., इंडस्ट्रीबद्दल यावेळी नीना गुप्ता थेटच म्हणाल्या
| Updated on: Oct 03, 2023 | 12:46 PM

मुंबई | 03 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. पण एक काळ असा होता, जेव्हा त्यांच्या करिरयला पूर्णपणे ब्रेक लागला होता. पण ‘बधाई हो’ सिनेमानंतर त्याचं नशीबचं चमकलं. आज अनेक सिनेमे आणि वेब सीरिजच्या माध्यमातून नीना गु्प्ता चाहत्यांच्या भेटीस असतात. महत्त्वाचं म्हणजे नीना गुप्ता कायम बॉलिवूडबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. दरम्यान नीना गुप्ता यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नीना गुप्ता कास्टिंग काऊचबद्दल बोलताना दिसत आहेत.

नीना गुप्ता म्हणाल्या, ‘याठिकाणी कोणीही कोणावर बळजबरी करत नाही. निर्णय पूर्णपणे तुमचा स्वतःचा असतो, तुम्हाला तडजोड करायची की नाही. ही अत्यंत सरळ गोष्ट आहे. जर तुम्ही नकार दिला, तर पुढे तडजोड करण्यासाठी १० मुली तयार असतात. पण तुम्ही दिग्दर्शक, निर्मात्यांसोबत शारीरिक संबंध ठेवाल आणि ते तुम्हाला कोणी भूमिका देईल असं नसतं…’

पुढे नीना गुप्ता म्हणाल्या, ‘तुम्हाला एखादी लहान भूमिका देखील मिळू शकते.. कारण हा व्यवसाय आणि निवड तुमची आहे.’ नीना गुप्ता कायम कोणत्याही मुद्द्यावर स्पष्ट बोलताना दिसतात. अनेक संकटांचा सामना करत त्यांनी स्वतःचं विश्व निर्माण केलं. आज त्यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेकांना माहिती आहे. एवढंच नाही तर, सोशल मीडियाच्या माध्यमातून नीना गुप्ता कायम तरुणांना रिलेशनशिपचे सल्ले देत असतात.

नीना गुप्ता सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर नीना गुप्ता यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नीना गुप्ता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

नीना गुप्ता यांचे सिनेमे

नीना गुप्ता लवकरच ‘मेट्रो… इन दिनों’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक अनुराग बसु (Anurag Basu) यांच्या खांद्यावर आहे. सिनेमात नीना गुप्ता यांच्यासोबत अभिनेत्री सारा अली खान, कोंकणा सेन शर्मा, फातिमा सना शेख, अभिनेता आदित्य रॉय कपूर, अनुपम खेर, पंकज त्रिपाठी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.