AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LOVE LIFE | धर्म बदलला, सिनेमे सोडले, प्रियकरासोबत लग्न करताच अभिनेत्रीला मिळाली जीवेमारण्याची धमकी

LOVE LIFE | झगमगत्या विश्वातील काही किस्से कायम समोर येत असतात. ज्यामुळे चाहत्यांना देखील सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्द अनेक गोष्टी कळतात. बॉलिवूडच्या एका अभिनेत्री धर्म बदलून प्रियकरासोबत लग्न केलं. पण अभिनेत्रीला लग्नानंतर जीवे मारण्याची धमकी मिळाली त्यानंतर मात्र...

LOVE LIFE | धर्म बदलला, सिनेमे सोडले, प्रियकरासोबत लग्न करताच अभिनेत्रीला मिळाली जीवेमारण्याची धमकी
| Updated on: Oct 03, 2023 | 12:07 PM
Share

मुंबई | 03 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी सर्व मर्यादा ओलांडून आयु्ष्यातील खास व्यक्तीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. ज्यासाठी अभिनेत्रींनी धर्म बदलला, बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि पूर्ण वेळ कुटुंबाला दिला… अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर… एक काळ असा होता जेव्हा फक्त आणि फक्त शर्मिला टागोर यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा रंगलेली असायची. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण लग्नानंतर शर्मिला टागो यांच्या आयुष्यात अनेक बदल झाले. रिपोर्टनुसार मंसूर अली यांच्यासोबत लग्न केल्यामुळे त्यांनी जीवेमारण्याची देखील धमकी मिळाली.

शर्मिला टागोर आणि मंसूर अली यांच्या लग्नामुळे अनेकांमध्ये नाराजी होती. ज्यामुळे शर्मिला टागोर यांना जीवेमारण्याची देखील धमकी मिळाली होती. मंसूर अली मुस्लीम शाही कुटुंबातील नवाब होते आणि शर्मिला टागोर बंगाली कुटुंबातील असल्यामुळे दोघांच्या कुटुंबियांना त्यांचं नातं मान्य नव्हतं.

आपल्या मुलाचं लग्न कोणत्या अभिनेत्रीसोबत व्हावं अशी मंसूर अली यांच्या कुटुंबियांची इच्छा नव्हती. तर दोघांच्या नात्यासाठी शर्मिला यांच्या कुटुंबियांचा देखील विरोध होता. लग्नानंतर शर्मील टागोर यांनी मुस्लीम धर्माचा स्वीकार केला आणि स्वतःचं नाव बदललं. लग्नानंतर आयेशा सुल्ताना अशी अभिनेत्रीला ओळख मिळाली.

लग्नानंतर काही वर्षांनंतर शर्मिला टागोर यांनी झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला. शर्मिला टागोल यांनी ‘आराधना’, ‘अमर प्रेम’, ‘आमने-सामने’, ‘चुपके-चुपके’ यांसारख्या असंख्य सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही शर्मिला टागोर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात.

शर्मिला टागोर यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी ‘गुलमोहर’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनेक वर्षांनंतर शर्मिला टागोर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शर्मिला टागोर आणि त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

‘ॲन इव्हनिंग इन पॅरिस’ सिनेमात शर्मिला टागोर यांचा बिकिनी लूक

१९६७ मध्ये अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी ‘ॲन इव्हनिंग इन पॅरिस’ या सिनेमात बिकिनी घालून अक्षरश: धुमाकूळ घातला होता. शर्मिला टागोर म्हणाल्या, एका मध्यरात्री त्यांना घराजवळील पोस्टर हटवावे लागले होते. शर्मिला यांच्या सासू त्यावेळी शहरात येणार होत्या. म्हणून ड्रायव्हरला सांगून त्यांनी घराजवळील सर्व बिकिनीचे पोस्टर्स हटवण्यास लावले होते. मात्र एअरपोर्टच्या मार्गावर इतरही पोस्टर असतील, हे त्यांच्या लक्षात आलं नव्हतं.

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.