Prabhas ला तरुणीने का मारली कानाखाली; थक्क करणारा व्हिडीओ समोर
Prabhas | विमानतळावर 'बाहुबली' फेम प्रभास याला पाहिल्यानंतर धावत आलेल्या तरुणीने अभिनेत्याला मारली कानाखाली, व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ... सोशल मीडियावर अभिनेत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल... तरुणीने असं का केलं?

मुंबई | 03 ऑक्टोबर 2023 : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास सध्या त्याच्या आगामी ‘सालार’ सिनेमामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता ‘सालार’ सिनेमाच्या कामांमध्ये व्यस्त आहे. पण ‘बाहुबली’ सिनेमानंतर अभिनेत्याचा कोणताच सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करू शकला नाही. तरी देखील अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. अभिनेत्याला पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. आता देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे व्हिडीओ जुना असल्याचं सांगण्यात येत आहे. पण व्हिडीओमध्ये एक तरुणी अभिनेत्याला कानाखाली मारताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
मीडियारिपोर्टनुसार, व्हायरल होत असलेला अभिनेत्याचा व्हिडीओ २०१९ मधील आहे. जेव्हा अभिनेत्याला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. आभिनेत्याला पाहिल्यानंतर त्याच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली. अभिनेत्याला पाहिल्यानंतर जमलेल्या गर्दीमध्ये असलेल्या एका तरुणीचा उत्साह शिगेला पोहोचला.
View this post on Instagram
प्रभास याला पाहताच तरुणी अभिनेत्याच्या दिशेने धावत आली आणि तिने प्रभास याच्यासोबत फोटो क्लिक केला. त्यानंतर अन्य चाहत्यांसोबत देखील प्रभास याने फोटो क्लिक केले. पण त्यानंतर तरुणी पुन्हा आली आणि प्रेमात प्रभासच्या कानाखाली मारली. चाहतीने कानाखाली मारल्यानंतर प्रभास देखील स्वतःच्या गालावर हात फिरवू लागला…
सध्या अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील अभिनेत्याच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. प्रभास याचे कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता सध्या चाहते प्रभास याच्या ‘सालार’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रभासचा ‘सालार’ हा सिनेमा सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र त्यानंतर त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता प्रभास आणि अभिनेता शाहरुख खान यांच्यामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. शाहरुख खान स्टारर ‘डंकी ‘ सिनेमा देखील सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रभास स्टारर ‘सालार’ सिनेमा की शाहरुख खान स्टारर ‘डंकी ‘ सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
