AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan | पार्टीमध्ये सलमान खान याची झाली अशी अवस्था, चिंताग्रस्त चाहते म्हणाले, ‘काळजी घे’

Salman Khan | सलमान खान याच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! पार्टीमध्ये भाईजानची झाली अशी अवस्था, चाहत्यांची चिंता वाढली... सोशल मीडियावर सलमान खान याचा व्हिडीओ व्हायरल... व्हिडिओमध्ये सलमानची प्रकृती पाहून चाहते त्याच्या तब्येतीची चिंता करताना दिसत आहेत.

Salman Khan | पार्टीमध्ये सलमान खान याची झाली अशी अवस्था, चिंताग्रस्त चाहते म्हणाले, 'काळजी घे'
| Updated on: Oct 03, 2023 | 9:59 AM
Share

मुंबई | 03 ऑक्टोबर 2023 : अभिनेता सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी किंवा त्याच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. पण आता सलमान खान याचा एक व्हिडीओ समोर येत आहे, ज्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. व्हिडिओमध्ये सलमानची प्रकृती पाहून चाहते त्याच्या तब्येतीची चिंता करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका बर्थडे पार्टीचा असल्याचं समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सलमान खान याच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.

एका नेटकऱ्याने अभिनेत्याचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सलमान एका श्रीमंत उद्योगपतीच्या नातवाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते थक्क झाले. सलमान याची प्रकृती खालावलेली दिसत आहे. शिवाय भाईजान थकलेला देखील दिसत आहे. तो स्वतःकडे दुर्लक्ष करून डान्स करताना दिसत आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सलमानला काही आरोग्य समस्या आहेत. काही महिन्यांपासून त्याने जिमला जाणे बंद केलं असल्याची दावा एका सोशल मीडियावर युजरने केला आहे. सध्या सर्वत्र सलमान खान याच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे. पण याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सलमान खान याचे आगामी सिनेमे…

सलमान खान याच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘टायगर ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. १० नोव्हेंबर रोजी ‘टायगर ३’ सिनेमा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमात सलमान खान याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय अभिनेता इमरान हश्मी देखील सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता ‘टायगर ३’ सिनेमा शिवाय अन्य सिनेमांच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक विष्णू वर्धन यांच्या सिनेमात देखील अभिनेता दिसणार आहे. एवढंच नाही तर सलमान खान अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत ‘टायगर वर्सेस पठाण’ सिनेमात देखील दिसणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?