Bobby Deol च्या ‘त्या’ व्हिडीओवर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया, म्हणाले, ‘माझा मुलगा…’
Bobby Deol | बॉबी देओल याचा असा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, वयाच्या ५४ व्या अभिनेत्याने वेधलं सर्वांचं लक्ष, धर्मेंद्र म्हणाले..., सध्या सर्वत्र बॉबी देओल याचा व्हिडीओ आणि त्याच्या व्हिडीओवर धर्मेंद्र यांनी केलेल्या कमेंटची चर्चा... सर्वत्र चर्चांना उधाण

मुंबई | 03 ऑक्टोबर 2023 : अभिनेते धर्मेंद्र कायम त्यांच्या खासगी आयु्ष्यामुळे आणि कुटुंबाबद्दल कायम चर्चेत असतात. धर्मेंद्र यांच्या कुटुंबाद्दल अनेक गोष्टी समोर येत असतात. धर्मेंद्र आणि त्यांची पहिली प्रकाश कौर देखील त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. पण आता धर्मेंद्र यांचा मुलगा आणि अभिनेता बॉबी देओल याच्याबद्दल चर्चा रंगत आहेत. बॉबी देओल याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या बॉबी त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. बॉबी लवकरच ‘एनिमल’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘एनिमल’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. ‘एनिमल’ सिनेमाच्या टीझरमध्ये शेवटी बॉबी देओल याच्या शर्टलेस लुकची झलक पाहायला मिळाली..
‘एनिमल’ सिनेमामधील बॉबी याच्या शर्टलेस लूकची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या शर्टलेस लूक तुफान व्हायरल होत आहे. यावर अभिनेते धर्मेंद्र यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.. धर्मेंद्र यांनी ट्विटरवर बॉबी देओल याचा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘माझा निरपराधी एनिमल..’ असं लिहिलं आहे. सध्या धर्मेंद्र यांचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
My innocent son in Animal…….. pic.twitter.com/aCNCuI6hTc
— Dharmendra Deol (@aapkadharam) October 2, 2023
धर्मेंद्र यांच्या ट्विटवरल चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. ‘बॉबी इतकाही निरपराधी नाही.. ‘ तर अन्य एका युजरने ‘जर निरपराधी आहे, तर तो देवदूत आहे…’ असं नेटकरी कमेंटमध्ये म्हणत आहेत. सांगायचं झालं तर, बॉबी देओल याने ‘एनिमल’ सिनेमासाठी भन्नाट फिजिकल ट्रान्सफॉर्मेश केलं आहे.
‘एनिमल’ सिनेमा
अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘अॅनिमल’ सिनेमा २ डिसेंबरला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमात रणबीर याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर देखील दिसणार आहेत. बॉबी वेब सीरिज ‘आश्रम 3’ मध्ये दिसला होता ज्यामध्ये त्याने काशीपूरच्या बाबा निरालाची भूमिका केली होती. सीरिजला चाहत्यांची पसंती दर्शवली होती.
बॉबी देओल याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने १९९५ साली प्रदर्शित झालेल्या‘बरसात’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉबी याच्या करियरच्या सुरुवातीला असंख्या तरुणांमध्ये अभिनेत्याची क्रेझ होती. ‘बादल’, ‘बिच्छू’ आणि ‘एतराज’ यांसारख्या सिनेमांमुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
