तुझा मेनोपॉज सुरू आहे का? रणबीर कपूरचा थेट आईलाच सवाल; नीतू कपूर यांनी सांगितला किस्सा

नीतू कपूर यांनी सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये मेनोपॉजबद्दल आपले विचार स्पष्ट केले. त्या म्हणतात की, मेनोपॉज ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्याबद्दल अनावश्यक हायपर होण्याची गरज नाही. त्यांनी स्वतःच्या अनुभवांबद्दल सांगितले, ज्यात हॉट फ्लॅशेस आणि मूड स्विंग्सचा समावेश होता. रणबीर कपूरने त्यांना एकदा गंमतीने विचारले होते, 'मॉम, तुझं मेनोपॉज अजूनही सुरू आहे का?'. हा किस्सा लोकांच्या अतिप्रतिक्रियेवर प्रकाश टाकतो.

तुझा मेनोपॉज सुरू आहे का? रणबीर कपूरचा थेट आईलाच सवाल; नीतू कपूर यांनी सांगितला किस्सा
रणबीर कपूर - नीतू कपूर
| Updated on: May 09, 2026 | 12:54 PM

बॉलिवूडच्या अभिनेत्री नीतू कपूर सध्या प्रचंड चर्चेत आहेत. 8 मे रोजी त्यांचा ‘दादी की शादी’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमावर प्रेक्षक आणि सिनेटिकाकारांच्या संमिश्रा प्रतिक्रिया येत आहेत. या सिनेमात कॉमेडियन कपिल शर्माने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर नीतू कपूर यांची मुलगी आणि ज्वेलरी डिझायनर रिद्धिमा कपूर साहनी या सिनेमातून फिल्मी जगतात पाऊल ठेवत आहे. याच सिनेमाच्या निमित्ताने नीतू कपूर या सोहा अली खानच्या एका पॉडकास्टमध्ये दिसल्या होत्या. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंग, पती ऋषी कपूर यांचा सहवास आणि फिल्मी करिअरसहीत मोनोपॉज (मासिक पााळी)वरही भाष्य केलं.

सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी लोकांच्या हायपर होण्याच्या मानसिकतेवरही भाष्य केलं. आजकाल लोकांनी थोडं शांत राहिलं पाहिजे. सर्वच लोक आता प्रत्येक गोष्टीसाठी हायपर होताना दिसत आहे. मेनोपॉजवरूनही लोक हायपर आहेत. अरे ही एकदम नैसर्गिक गोष्ट आहे. मेनोपॉजमधून जाणं ही नैसर्गिक बाब आहे. तिकडे मात्र मेनोपॉज पॉडकास्ट होत आहे. हॉट फ्लॅशेज होत आहेत. मला या सर्वांचं हसू येतंय. कारण ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. प्रत्येक महिला या अवस्थेतून जातेच, असं नीतू कपूर म्हणाल्या.

आणखी काय म्हणाल्या ?

अनेक महिला मेनोपॉजमधून गेल्या, पण काय होतंय हे त्यांना कळलंच नाही, असं कधी झालंय का? असा सवाल सोहाने केला. त्यावर नीतू यांनी थेट उत्तर दिलं. पण तुमच्याकडे मित्र-मैत्रीणी आहेत ना (सांगण्यासाठी). तुम्हाला या गोष्टीचा मोठा मुद्दा बनवण्याची गरज नाहीये. थोडं शांत राहिलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या.

नीतू यांनीही त्यांच्या मेनोपॉजवर भाष्य केलं. माझी हालत खूप वाईट होती. मी तयार व्हायचे, पण हॉट फ्लॅशेसमुळे मला इतका घाम यायचा की माझा पूर्ण मेकअप निघून जायचा. मला बाहेर जायची अजिबात इच्छा होत नव्हती. मी माझी रजई, पांघरूण फेकून द्यायचे, कारण मला खूप गरम व्हायचं. मी माझ्या कुटुंबाला सांगितलं होतं की बघा, मी मेनोपॉजमधून जाणार आहे आणि मला मूड स्विंग्स येतील, त्यामुळे माझ्याशी नीट वागा. ठीक आहे? त्या सगळ्यांनी समजून घेतलं. माझे पती , माझी मुलं यांनीही समजून घेतलं, असं त्या म्हणाल्या.

त्यांनी नंतर एक गंमतीदार किस्साही सांगितला. मला फारसे मूड स्विंग्स झाले नव्हते. पण काही वर्षांनंतर काहीतरी झालं असेल आणि मला राग आला होता, तेव्हा रणबीर म्हणाला, ‘मॉम, तुझं मेनोपॉज अजूनही सुरू आहे का? मला वाटलं होतं की ते आतापर्यंत संपलं असेल, असं त्या म्हणाल्या. शेवटी नीतू कपूर म्हणाल्या, सगळंच खूप ओव्हरहाइप केलं जातंय. सगळेच वेडेपिसे होत आहेत आणि प्रत्येक गोष्टीवर जास्तच प्रतिक्रिया देत आहेत.

 

Follow Us