
बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चेत राहणारं कुटुंब तशी अनेक आहेत त्यांपैकी एक म्हणजे कपूर कुटुंब. या कुटुंबाचे अनेक कार्यक्रम होत असतात. तसेच कोणताही कार्यक्रम असो किंवा सण हे कुटुंब नेहमीच एकत्र साजरा करताना दिसतात. आताही या कुटुंबाची चर्चा सुरु आहे ती एका शोवरून जो सध्या फार चर्चेत आहे. “डायनिंग विथ द कपूर्स” हा शो आता नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. जो प्रेक्षकांना कपूर कुटुंबाची झलक दाखवतो. या शोमध्ये रणबीर कपूर आणि करीना कपूर यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण कुटुंब, नीतू सिंग, सैफ अली खान, करिश्मा कपूर आणि कुटुंबातील इतर सदस्य दिग्गज चित्रपट निर्माते राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त साजरे करत आहेत.
करीनाने नीतू कपूरबद्दलचा एक किस्सा सांगितला
या शोसाठी अरमान जैनने जेवणाचे आयोजन केले होते. तसेच या शोमध्ये कपूर कुटुंबातील प्रसंगांबद्दल, अनेक घटनांबद्दल चर्चा करण्यात आली. लहानपणीच्या अनेक आठवणी देखील यावेळी काढण्यात आल्या. दरम्यान या शोमध्ये जेवणाच्या टेबलावर बसून सगळे गप्पा मारताना दिसत आहे. तेव्हा करीनाने त्यावेळी एका प्रसंगाची आठवण करून देत नीतू कपूरबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. जेव्हा नीतू कपूरने करीनाला तिच्या गरोदरपणात असताना एक सल्ला दिला होता. तसेच तिला त्याबद्दल फटकारलं देखील होतं.
करीनाला नीतू कपूरने नक्की कशाबद्दल फटकारलं
जेवणावरून कपूरमध्ये कोण जास्त फुडी आहे हे विचारचाच नीतूने करीनाकडे बोट दाखवत म्हटलं, “तू खूप जास्त जेवतेस.” करीनाने यालाच अनुसरून मध्येच सांगितले, “मी गरोदर असताना तू मला खूप खाताना पाहिले होतेस आणि तू माझ्यावर रागावली होतीस आणि मला जास्त खाऊ नको असं सतत सांगत होतीस. आणि मी तुला म्हटलं होतं की मी प्रेग्नंट आहे.” हा किस्सा सांगत करीनाने तिला नीतू यांनी का फटकारलं होतं हे सांगितलं आहे.
नीतू करीनाला म्हणाल्या ‘तू किती खात आहेस?’
नंतर, जेवणाच्या टेबलावर, रणबीरने त्याच्या आजीच्या बेक्ड मॅक अँड चीजची आठवण काढली आणि त्याला त्याच्या पहिल्या जेवणाच्या आठवणींपैकी एक म्हटले. नीतू कपूर यांनी सांगितले की ही डिश प्रत्येक जेवणात अवश्य खावी लागते. त्यावेळी करीनाने सांगितले की नीतू तिला जास्त खाण्याबद्दल चिडवण्याची एकही संधी सोडत नव्हती.करीनाने म्हटलं की, “माझ्या गरोदरपणात जेव्हा मी बेक्ड डिश खात असे आणि मी जास्त खात असे तेव्हा ती म्हणायची, तू किती खात आहेस? तेव्हा मी मी म्हणायचे की मी गरोदर आहे, मला खाण्याची परवानगी आहे.’ पण ती म्हणायची, ‘हे सर्व खाऊ नकोस.’
“मध्यरात्री गोड पदार्थांची प्रचंड इच्छा व्हायची.”
यापूर्वी, इंस्टाग्रामवर तिच्या गरोदरपणातील तिच्या खाण्याबद्दल बोलताना, करीनाने खुलासा केला की ती पिझ्झा खाण्यास आवर घालू शकत नव्हती. तिने असेही म्हटले की तिला अनेकदा “मध्यरात्री गोड पदार्थांची प्रचंड इच्छा व्हायची.” करीनाने असेही कबूल केले की तिला एक ग्लास वाइन पिण्याची तीव्र इच्छा होत असे. तिने गर्भधारणेदरम्यान तिच्या शरीरात कसे बदल झाले होते याबद्दल देखील सांगितले आणि सांगितले की कधीकधी तिला तिचे आवडते पदार्थ खाल्ल्यानंतर मळमळ व्हायची.
आलिया भट्ट अनुपस्थित होती
दरम्यान या खास शोसाठी संपूर्ण कपूर कुटुंब उपस्थित होते, परंतु रणबीरची पत्नी आलिया भट्ट विशेष अनुपस्थित होती. त्यांच्या अनुपस्थितीमुळे चाहत्यांमध्ये चर्चा निर्माण झाली होती, परंतु विशेष शोचे निर्माते, अरमान जैन आणि स्मृती मुंद्रा यांनी या अफवांना पूर्णविराम दिला. एका मुलाखतीदरम्यान अरमानने स्पष्ट केले, “शूट करण्यापूर्वी माझ्या काही वचनबद्धता होत्या. मी कदाचित फिल्मी वाटेन, परंतु राज कपूर म्हणायचे की, ‘काम हीच पूजा आहे.’